'कुंग-फू-योगा'साठी जॅकी चँग येणार भारतात

By Admin | Updated: March 19, 2016 11:48 IST2016-03-19T11:40:36+5:302016-03-19T11:48:45+5:30

'कुंग-फू-योगा' या चित्रपटासाठी जॅकी चॅन २१ मार्चला भारतात येणार असून या चित्रपटात सोनू सूद आणइ अमेयरा दस्तूरही झळकणार आहे.

Jackie Chang will be available for 'Kung-Fu-Yoga' in India | 'कुंग-फू-योगा'साठी जॅकी चँग येणार भारतात

'कुंग-फू-योगा'साठी जॅकी चँग येणार भारतात

ऑनलाइन लोकमत

दुबई, दि. १९ - अॅक्शन स्टार जॅकी चॅनचे जगभरात लाखो चाहते आहेत. त्याचे अॅक्शन सिक्वेन्स,स्टंट्स, त्याची स्टाईल याचे भारतीय नागरिकही प्रशंसक आहेत. हाच जॅकी चॅन आपल्या पुढील चित्रपटाच्या शूटिंगसाठी भारतात येत आहे. ' कुंग-फू-योगा' या चित्रपटासाठी तो २१ मार्च रोजी भारतात येणार असून जयपूरमध्ये वास्तव्य करणार आहे. भारतीयांसाठी आणखी एक खुशखबर म्हणजे या चित्रपटात जॅकीसोबत अभिनेता सोनू सूद आणि अमेयरा दस्तूरही झळकणार आहेत. 
सोनू सूदनेच ही माहिती जाहीर केली आहे. ' जॅकी २१ मार्चला १५ दिवसांसाठी भारतात येत आहेत, ते जयपूरमध्ये राहणार आहेत. आम्ही या चित्रपटाचे एक शेड्यूल पूर्ण केले असून आताता भारतातील शुटिंगची तयारी सुरू आहे, त्यानंतर आम्ही बीजिंगला रवाना होऊ' असे सोनूने सांगितले. 
'कुंग-फू-योगा' हा अॅक्शनपट येत्या ऑक्टोबरमध्ये रिलीज होणार आहे. 
 

Web Title: Jackie Chang will be available for 'Kung-Fu-Yoga' in India