व्हेंटिलेटरमध्ये पिगी चॉप्स करणार आयटम नंबर

By Admin | Updated: January 28, 2016 02:49 IST2016-01-28T02:49:44+5:302016-01-28T02:49:44+5:30

राम चाहे लीला, बबली बदमाश है, पिंकी हे पैसेवालों की’ या आयटम डान्स आणि चित्रपटांमध्ये उत्कृष्ट अभिनय करून तरुणांच्या मनावर राज्य करणारी पिगी चॉप्स आता ‘व्हेंटिलेटर’

Item number for piggy chops in ventilator | व्हेंटिलेटरमध्ये पिगी चॉप्स करणार आयटम नंबर

व्हेंटिलेटरमध्ये पिगी चॉप्स करणार आयटम नंबर

राम चाहे लीला, बबली बदमाश है, पिंकी हे पैसेवालों की’ या आयटम डान्स आणि चित्रपटांमध्ये उत्कृष्ट अभिनय करून तरुणांच्या मनावर राज्य करणारी पिगी चॉप्स आता ‘व्हेंटिलेटर’ या तिच्या आगामी मराठी चित्रपटामध्ये आयटम नंबर करणार आहे. पर्पल पेबल पिक्चर्स या स्वत:च्या प्रॉडक्शन हाऊसद्वारे प्रियांका चोप्रा व्हेंटिलेटर या आपल्या पहिल्या मराठी चित्रपटाची निर्मिती करून मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण करीत आहे. या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन ‘फेरारी की सवारी’ या हिंदी चित्रपटाचे दिग्दर्शक राजेश मापुसकर करीत आहेत. तसेच मराठी इंडस्ट्रीमध्ये मानसी नाईक, संस्कृती बालगुडे, नेहा पेंडसे यासारख्या अनेक अभिनेत्रींनी आयटम डान्स करून मराठी प्रेक्षकांच्या मनाला मोहिनी घातली आहे; परंतु या सर्व अभिनेत्रींना टक्कर देण्यासाठी प्रियांका चोप्रा येत आहे. त्यामुळे सर्व मराठी आयटम नंबर करणाऱ्या अभिनेत्रींना कॉप्लेक्स येणार, हे निश्चित. आता पाहू मराठमोळी बनू पाहणाऱ्या प्रियांका चोप्राच्या व्हेंटिलेटरमधील आयटम डान्सला प्रेक्षकांची किती पसंती मिळते.

Web Title: Item number for piggy chops in ventilator