अक्षयसाठी ‘धोनी’ साकारणे अशक्य

By Admin | Updated: September 14, 2016 04:08 IST2016-09-14T04:08:47+5:302016-09-14T04:08:47+5:30

कॅप्टन कूल महेंद्रसिंग धोनीच्या जीवनावर आधारित चित्रपटाचे दिग्दर्शक नीरज पांडे यांना वाटते की, धोनीच्या भूमिकेसाठी अक्षय कुमारची निवड करणे अशक्य होते

It is impossible to make 'Dhoni' for Akshay | अक्षयसाठी ‘धोनी’ साकारणे अशक्य

अक्षयसाठी ‘धोनी’ साकारणे अशक्य

कॅप्टन कूल महेंद्रसिंग धोनीच्या जीवनावर आधारित चित्रपटाचे दिग्दर्शक नीरज पांडे यांना वाटते की, धोनीच्या भूमिकेसाठी अक्षय कुमारची निवड करणे अशक्य होते. अक्षयच्या अभिनय कौशल्यावर प्रश्न उपस्थित केल्यासारखे वाटू देऊ नका. ‘स्पेशल 26’, ‘बेबी’, ‘रुस्तम’ यांसारख्या चित्रपटात एकत्र काम केल्यानंतर धोनी जीवनपटातही अक्षयला रोल का आॅफर केला नाही असे विचारल्यावर नीरज म्हणाला की, ‘अक्षय उत्तम अभिनेता आहे यामध्ये कोणाचे दुमत नाही. परंतु चित्रपटाच्या पटकथेनुसार अक्षयला १५-१६ वर्षांचा मुलगा दाखवणे तितके संयुक्त वाटले नसते. प्रत्येक भूमिकेच्या काही गरजा असतात, त्यानुसारच अभिनेत्याची निवड करण्यात येते.’ चित्रपटात सुशांतसिंग राजपूत धोनीची भूमिका साकारत आहे. टीसी ते भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार असा धोनीचा प्रेरणादायी प्रवास यामध्ये पाहायला मिळणार आहे. येत्या ३० सप्टेंबर रोजी हा सिनेमा प्रदर्शित होत आहे.

Web Title: It is impossible to make 'Dhoni' for Akshay