प्रेग्नंट आहे अरबाजची दुसरी पत्नी? व्हायरल व्हिडिओमध्ये दिसला बेबी बंप
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2025 16:55 IST2025-05-27T16:55:16+5:302025-05-27T16:55:42+5:30
अरबाज पुन्हा बाबा होणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. अशातच शूराचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

प्रेग्नंट आहे अरबाजची दुसरी पत्नी? व्हायरल व्हिडिओमध्ये दिसला बेबी बंप
बॉलिवूड अभिनेता अरबाज खान त्याच्या पर्सनल लाइफमुळे चर्चेत आला आहे. अरबाजने मलायकासोबत घटस्फोट घेतल्यानंतर २०२३ मध्ये मेकअप आर्टिस्ट शूरा खानशी निकाह करत पुन्हा संसार थाटला. त्याच्या दुसऱ्या लग्नाची प्रचंड चर्चा रंगली होती. आता अरबाज पुन्हा बाबा होणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. अशातच शूराचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे.
इन्स्टंट बॉलिवूड या इन्स्टाग्राम पेजवरुन अरबाजची दूसरी पत्नी शूराचा एका व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओत तिला स्पॉट करण्यात आल्याचं दिसत आहे. शूराने डेनिमचे शॉर्ट आणि शर्ट परिधान केलं आहे. यामध्ये तिचा बेबी बंपही चाहत्यांना दिसत आहे. शिवाय शूरा अगदी सावधपणे चालत असल्याचही दिसत आहे. चाहत्यांनी या व्हिडिओवर शूरा गरोदर आहे का? अशा कमेंट केल्या आहेत. शूराचा हा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. गेल्या कित्येक दिवसांपासून शूरा गरोदर असल्याच्या चर्चा आहेत. मात्र अद्याप याबाबत अरबाजने कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.
अरबाजने १९९८ मध्ये मलायका अरोराशी लग्न केला होतं. लग्नानंतर १९ वर्षांनी घटस्फोट घेत ते वेगळे झाले. त्यांना अरहान हा मुलगा आहे. आता पुन्हा अरबाज बाबा होणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत.