​द कपिल शर्मा शोमध्ये इरफान पठाण आणि युसूफ पठाणने शेअर केले अनेक सिक्रेट्स

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 3, 2017 17:45 IST2017-07-03T10:35:07+5:302017-07-03T17:45:22+5:30

द कपिल शर्मा शोमध्ये नेहमीच सेलिब्रेटी येऊन मजा-मस्ती करताना आपल्याला पाहायला मिळते. तसेच अनेक सेलिब्रेटी आपल्या आयुष्यातील अनेक सिक्रेट ...

Irfan Pathan and Yusuf Pathan shared the many secrets of the Kapil Sharma show | ​द कपिल शर्मा शोमध्ये इरफान पठाण आणि युसूफ पठाणने शेअर केले अनेक सिक्रेट्स

​द कपिल शर्मा शोमध्ये इरफान पठाण आणि युसूफ पठाणने शेअर केले अनेक सिक्रेट्स

कपिल शर्मा शोमध्ये नेहमीच सेलिब्रेटी येऊन मजा-मस्ती करताना आपल्याला पाहायला मिळते. तसेच अनेक सेलिब्रेटी आपल्या आयुष्यातील अनेक सिक्रेट या कार्यक्रमात शेअर करतात. या कार्यक्रमात नुकतीच प्रसिद्ध क्रिकेटर इरफान पठाण आणि युसूफ पठाण यांनी हजेरी लावली होती. या कार्यक्रमात त्या दोघांचे संपूर्ण कुटुंब प्रेक्षकांना पाहायला मिळाले होते. या सगळ्यांनी मिळून कार्यक्रमात खूप धमाल मस्ती केली होती. 
इरफान पठाणने नुकताच इन्स्टाग्रामला एक फोटो पोस्ट केला आहे. त्या फोटोत त्याच्यासोबत आपल्याला युसूफ, त्याचे वडील आणि द कपिल शर्मा शोची टीम दिसत आहे. तसेच आपण भेटूया द कपिल शर्मा शोमध्ये असे देखील त्याने या फोटोसोबत लिहिले आहे. 
इरफान आणि युसूफने या कार्यक्रमात येऊन आपल्या बालपणीच्या अनेक आठवणींना उजाळा दिला. ते दोघेच नेहमीच एकमेकांची खोडी काढत असत. युसूफने या कार्यक्रमात त्यांच्या लहानपणीचे अनेक सिक्रेटदेखील सगळ्यांना सांगितले. त्याने सांगितले, लहानपणी मी आणि इरफान दोघेही खूप मस्ती करत असू. पण वडिलांचा ओरडा नेहमी मीच खात असे. तसेच लहान असल्यापासूनच इरफानला व्यायामाची आवड होती. त्यामुळे तो अतिशय फिट होता. पण मी कधीच व्यायाम करण्यात रस न दाखवल्याने मला वडिलांचा ओरडा खावा लागत असे. पण याच व्यायामाचा इरफानला नेहमीच फायदा झाला. त्यामुळेच भारतीय टीममध्ये त्याला त्याची जागा बनवता आली असे देखील त्याने कबूल केले. इरफानमुळे मी देखील आता व्यायाम करायला लागलो आहे. 

Also Read : चंदन प्रभाकर परतला द कपिल शर्मा शोमध्ये
 

Web Title: Irfan Pathan and Yusuf Pathan shared the many secrets of the Kapil Sharma show

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.