सलमान खान तुरुंगात गेला तर बॉलिवूडला बसू शकतो कोटींचा फटका
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2018 17:07 IST2018-04-05T16:54:59+5:302018-04-05T17:07:21+5:30
काळवीट शिकार प्रकरणी अभिनेता सलमान खानला जोधपूर न्यायालयाने दोषी ठरवले आहे. याप्रकरणी त्याला पाच वर्षांचा तुरुंगवास आणि 10 हजारांच्या दंडाची शिक्षा सुनावली आहे. त्यामुळे जर सलमान खान तुरुंगात गेला तर त्याचा फटका बॉलिवूडला बसणार आहे.

सलमान खान तुरुंगात गेला तर बॉलिवूडला बसू शकतो कोटींचा फटका
मुंबई : 19 वर्षापूर्वीच्या म्हणजेच 1998च्या काळवीट शिकार प्रकरणी अभिनेता सलमान खानला जोधपूर न्यायालयाने दोषी ठरवले आहे. याप्रकरणी त्याला पाच वर्षांचा तुरुंगवास आणि 10 हजारांच्या दंडाची शिक्षा सुनावली आहे. त्यामुळे जर सलमान खान तुरुंगात गेला तर त्याचा फटका बॉलिवूडला बसणार आहे. त्याच्या आगामी चित्रपटांवर याचा परिणाम होऊ शकतो.
गेल्या काही दिवसांपूर्वी आबुधाबी मध्ये 'रेस3' या चित्रपटाचे शूटिंग संपवून सलमान मुंबईत परतला आहे. यानंतर तो 'दबंग 3' आणि 'भारत'च्या शूटिंगला सुरुवात करणार आहे. दंबग 3 आणि 'भारत'च्या शिवाय 'किक 2' या चित्रपटांची घोषणा सुद्धा करण्यात आली आहे. त्यामुळे जर सलमान खान तुरुंगात गेला तर त्याच्या या चित्रपटांचे चित्रिकरण लांबणीवर जाण्याची शक्यता आहे. 'दबंग 3', 'भारत' आणि 'किक 2' या तीन चित्रपटांसाठी जवळपास 550 कोटी लागले आहेत. याचबरोबर सलमान खानचा 'बिग बॉस'चा 12 सीजन आणि 'दस का दम'सुद्धा टीव्हीवर सुरु होणार आहेत. 'दस का दम' या रिअॅरिटी शोचा प्रोमोसुद्धा आऊट झालेला आहे. त्यामुळे सलमान खान तुरुंगात गेला तर या शोंचे सुद्धा मोठे नुकसान होऊ शकते. दरम्यान, सलमान खान एका शोसाठी 11 कोटी रुपयांचे मानधन घेतो.
1998 सालच्या काळवीट शिकार प्रकरणात जोधपूर न्यायालयाने गुरुवारी अभिनेता सलमान खान याला दोषी ठरवले. या प्रकरणी न्यायालयाने त्याला पाच वर्षांचा तुरूंगवास आणि 10 हजारांच्या दंडाची शिक्षा सुनावली आहे. या निकालानंतर सलमान खान याला जोधपूरच्या सेंट्रल जेलमध्ये नेण्यात येणार असून आज त्याला जामीन मिळण्याची शक्यता धुसर आहे. त्यामुळे किमान आजचा दिवस तरी सलमान खानला तुरूंगातच काढावा लागणार आहे. हा निकाल सलमान खानसाठी मोठा झटका मानला जात आहे. तर दुसरीकडे या प्रकरणातील सहआरोपी अभिनेता सैफ अली खान, तब्बू, नीलम आणि सोनाली बेंद्रे यांची न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली.