रणबीरसाठी मला सोडशील तर पस्तावशील - सलमाननं दिला होता इशारा
By Admin | Updated: February 16, 2016 19:02 IST2016-02-16T19:02:37+5:302016-02-16T19:02:37+5:30
रणबीरसाठी जर तू मला सोडलंस तर भविष्यात तुझ्यावर पस्तावण्याची वेळ येईल असा इशारा मद्यधुंद अवस्थेत सलमाननं कतरिनाला दिला होता, असं वृत्त एका एंटरटेनमेंट वेबसाईटनं दिलं आहे

रणबीरसाठी मला सोडशील तर पस्तावशील - सलमाननं दिला होता इशारा
>ऑनलाइन लोकमत
रणबीर कतरिना आता रिलेशनशिपमध्ये नसल्याचं जगजाहीर झालेलं असताना पाच वर्षांपूर्वी सलमान खानने केलेली भविष्यवाणी सत्यात उतरल्याचं दिसत आहे. रणबीरसाठी जर तू मला सोडलंस तर भविष्यात तुझ्यावर पस्तावण्याची वेळ येईल असा इशारा मद्यधुंद अवस्थेत सलमाननं कतरिनाला दिला होता, असं वृत्त एका एंटरटेनमेंट वेबसाईटनं दिलं आहे.
2009 मध्ये हा सल्ला सलमाननं रणबीरला दिला होता. मला सोडू नकोस, तू चूक करतेयस, रणबीर तुझा ह्रदयभंग करेल या शब्दांत सलमाननं कतरिनाला सावध केलं होतं असं या वृत्तात म्हटलं आहे.
आणि अनेक वर्षे रिलेशनशिपमध्ये असलेलं हे सेलिब्रिटी कपल अखेर विभक्त झाल्याचं वृत्त काही दिवसांपूर्वी आलं आणि सलमानची कथित भविष्यवाणी खरी ठरल्याची चर्चा सुरू झाली.