"मी बाबा रामदेव यांच्यापेक्षा जास्त कपडे घालते"
By Admin | Updated: September 26, 2016 17:11 IST2016-09-26T16:58:16+5:302016-09-26T17:11:34+5:30
तंग कपडे घालण्यावरून आणि अंगप्रदर्शन करण्यावरून टीका करणा-यांना उत्तर

"मी बाबा रामदेव यांच्यापेक्षा जास्त कपडे घालते"
>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 26- वेगवेगळ्या कारणांमुळे वादात असणारी आणि बिग बॉसमुळे नावारुपास आलेली अभिनेत्री सोफिया हयात पुन्हा एकदा चर्चेत आहे. तंग कपडे घालण्यावरून आणि अंगप्रदर्शन करण्यावरून तिच्यावर टीका करणा-यांना तिने उत्तर दिलं आहे. 'मी बाबा रामदेव यांच्यापेक्षा जास्त कपडे घालते' अशी पोस्ट तिने इन्स्टाग्रामवर केली आहे.
नुकताच सोफियाने स्वतःचा एक हॉट फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला असून त्यासोबत तिने तंग कपड्यांवरून टीका करणा-यांना उत्तर देतान मी अजुनही बाबा रामदेव यांच्यापेक्षा जास्त कपडे घालते असा मेसेज टाकला आहे.