"मी अनेक वेळा रात्रीचे जेवण करत नाही, विचार करते...!"; करण जौहरसोबत अगदी मोकळेपणानं बोलली सानिया मिर्झा
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 19, 2025 20:05 IST2025-11-19T20:04:13+5:302025-11-19T20:05:33+5:30
एकटेपणासंदर्बात बोलताना सानिया म्हणाली, "मी अनेकवेळा रात्रीचे जेवण करत नाही, फक्त हा विचार करून की..."

"मी अनेक वेळा रात्रीचे जेवण करत नाही, विचार करते...!"; करण जौहरसोबत अगदी मोकळेपणानं बोलली सानिया मिर्झा
टेनिस स्टारा सानिया मिर्झाने (Sania Mirza) घटस्फोटानंतर, येणाऱ्या समस्यांसंदर्भात पुन्हा एकदा खुलेपणाने भाष्य केले आहे. सानिया मिर्जाने पाकिस्तानी क्रिकेटर शोएब मलिक सोबत लग्न केले होते. यानंतर ते दुबईला शिफ्ट झाले होते. मात्र त्यांचे लग्न जास्त दिवस टिकू शकले नाही. शोएबसोबतच्या घटस्फोटानंतर सानिया आपल्या मुलासोबत दुबईतच राहते. तिने आपल्या शो दरम्यान चित्रपट निर्माता करण जोहर (Karan Johar) सोबत बोलताना, आपल्या भावना व्यक्त केल्या. यावेळी, कामासाठी मुलाला एकटे सोडणे तिच्यासाठी सर्वात मोठे चॅलेंज असल्याचे तिने म्हटले आहे.
मुलाला एकटे सोडणे मोठे चॅलेंज -
सानियाने सांगितले की, घटस्फोटानंतर आपल्याल अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. मात्र, सर्वात मोठे आव्हान म्हणजे, काम आणि करिअरसाठी मुलाला एकटे सोडून भारतात येणे. "“माझ्यासाठी, सिंगल पॅरेंटिंग अवघड आहे. कारण आपण वर्किंग आहोत आणि दोघेही फार वेगळे काम करतो.” यावेळी करणने तिला पॉझिटिव्ह साइड दाखवण्याचाही प्रयत्न केला. तो म्हणाला, “आपण याची दुसरी बाजू बघितली? आता आपल्याला दुसऱ्या कुणाच्या इच्छेत अथवा निर्णयात अडकून राहावे लागत नाही."
रात्रीच्या जेवणावरही परिणाम:
एकटेपणासंदर्बात बोलताना सानिया म्हणाली, "मी अनेकवेळा रात्रीचे जेवण करत नाही, फक्त हा विचार करून की, यार, एकटी बसून कोण जेवण करणार? मला वाटते, मला याचा वजन कमी होण्यास फायदा झाला. रात्री जेवण करण्याची माझी इच्छा नसते. काहीतरी पाहत पाहत झोपणे मला अधिक बरे वाटते."