सनीला आवडतो धोनी!

By Admin | Updated: April 25, 2017 22:49 IST2017-04-25T22:49:12+5:302017-04-25T22:49:12+5:30

बॉलीवूड चित्रपटातील दमदार भूमिकांसोबतच सनीच्या मनात क्रिकेटबद्दलही रुची निर्माण झाली आहे. तसेच आपल्या आवडत्या क्रिकेटपटूबाबतही

I love Sunny! | सनीला आवडतो धोनी!

सनीला आवडतो धोनी!

>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 25 -  मुळची कॅनेडियन असलेली पॉर्नस्टार सनी लियॉनी आता भारतात चांगलीच रुळली आहे. बॉलीवूड चित्रपटातील दमदार भूमिकांसोबतच सनीच्या मनात क्रिकेटबद्दलही रुची निर्माण झाली आहे. तसेच आपल्या आवडत्या क्रिकेटपटूबाबतही सनीने खुलासा केला आहे. 
ट्विटरवर चाहत्यांच्या प्रश्नांना उत्तर देताना सनीने क्रिकेटप्रेम आणि आपल्या आवडत्या क्रिकेटपटूविषयी माहिती दिली आहे. तुझा आवडता क्रिकेट संघ कोणता आणि आवडता क्रिकेटपटू कोण असा प्रश्न ट्विटरवर विचारला असता सनीने आपल्याला भारतीय क्रिकेट संघ आवडतो आणि आपला आवडता क्रिकेटपटू भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी असल्याचे सांगितले. 
 प्रसिद्ध पॉर्नस्टार असलेली सनी लियॉनी 2011 साली बिग बॉसमध्ये सहभागी होण्यासाठी भारतात आली. त्यानंतर तिने आपल्या अभिनयाच्या जोरावर बॉलिवूडमध्येही जम बसवला. त्यामुळे ती भारतात एक लोकप्रिय चेहरा बनली आहे. 

Web Title: I love Sunny!