मला फक्त एकच तारीख माहित आहे, कॅटरिनाच्या वाढदिवसाची - सलमान खान

By Admin | Updated: July 14, 2017 14:20 IST2017-07-14T14:15:55+5:302017-07-14T14:20:54+5:30

एकवेळचे लव्हबर्ड असलेलेल सलमान सलमान खान आणि कॅटरिना सध्या चांगले मित्र झाले आहे. सध्या ते दोघेही आयफा पुरस्कार सोहळ्यासाठी न्यूयॉर्कमध्ये आहेत.

I know only a date, Katrina's birthday - Salman Khan | मला फक्त एकच तारीख माहित आहे, कॅटरिनाच्या वाढदिवसाची - सलमान खान

मला फक्त एकच तारीख माहित आहे, कॅटरिनाच्या वाढदिवसाची - सलमान खान

tyle="text-align: justify;">ऑनलाइन लोकमत
न्यूयॉर्क, दि. 14 - एकवेळचे लव्हबर्ड असलेलेल सलमान सलमान खान आणि कॅटरिना सध्या चांगले मित्र झाले आहे. सध्या ते दोघेही आयफा पुरस्कार सोहळ्यासाठी न्यूयॉर्कमध्ये आहेत. या दोघांची खूपच चांगली केमिस्ट्री तिथे पाहायला मिळत आहे. या पुरस्कार सोहळ्याच्या पत्रकार परिषदेसाठी ते दोघे वेगवेगळे आले असले तरी नंतर ते सतत एकमेकांसोबतच होते. पत्रकार परिषदेच्या दरम्यान ते दोघे सतत एकमेकांशी बोलत असल्याचे तसेच सलमान कॅटरिनाची टर खेचत असल्याचे दिसून आले. पत्रकार परिषदेत सलमानला बोलण्यासाठी ज्यावेळी विनंती करण्यात आली, त्यावेळी पुरस्कार सोहळा कोणत्या दिवशी आहे हे मला आठवत नाहीये असे तो म्हणाला. त्यावर हा पुरस्कार सोहळा 16 ला आहे असे त्याला सगळ्यांनी सांगितले. त्यावेळी 16 ला पुरस्कार आहे हे मला आठवत नसले तरी या दिवशी कॅटरिनाचा वाढदिवस असल्याचे माझ्या चांगलेच लक्षात असल्याचे त्याने सांगितले आणि आपण सगळ्यांनी मिळून तिला विश करूया असे म्हणत त्याने बॅपी बर्थडे कॅटरिना गायला सुरुवात केली. सलमानच्या या सुरात वरुण धवन, शाहिद कपूर आणि आलिया भट्ट यांनीही सुर मिसळला.
आणखी वाचा - 
(अ‍ॅडव्हान्स टॅक्स भरणाऱ्या अभिनेत्यांमध्ये सलमानच सुलतान)
(हृतिक रोशनसोबत पुन्हा एकदा "या" चित्रपटात झळकणार कतरिना कैफ)
 या कार्यमकात पुढे बोलताना सलमान म्हणला, बर्थडे गीत गाण्याची सगळ्यात चांगली गोष्ट तुम्हाला माहीत आहे का तुम्ही वाढदिवसाचे गाणे गायले की, तुम्हाला समोरच्याकडून काहीतरी मिळते असे म्हणत त्याने कॅटरिनाला अलिंगन दिले, हे पाहाताच उपस्थितांनी कॅटरिना आणि सलमानसाठी चिअर केले. एवढेच नाही तर कॅटरिनाचा वाढदिवस राष्ट्रीय सुट्टी म्हणून घोषित केला पाहिजे असे देखील त्याने म्हटले. सलमान आणि कॅटरिनाची जोडी ही त्यांच्या फॅन्सना खूपच आवडते. त्यांची ही जवळीक पाहाता त्यांच्या फॅन्सना प्रचंड आनंद होणार यात काही शंकाच नाही. सलमान कॅटचे काही फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. यामध्ये ते एकमेंकाना अलिंगन देत असल्याचे दिसत आहे. त्यांच्यामध्ये चांगलीच ट्युनिंग असल्याचेही पहायला मिळतेय. सलमान खानने कॅटसाठी गायलेलं गाण सध्या सोशम मीडियावर झपाट्याने व्हायरल होत आहे.

दरम्यान, सलमान-कॅटचा टायगर जिंगा है चा पुढच्या भागाचे चित्रिकरण सुरु आहे. या वर्षाखेरीस हा चित्रपट रिलीज होणार आहे. या चित्रपटाचे पहिल्या सत्रातील शुटींग ऑस्ट्रेलियात संपवले आहे.

Web Title: I know only a date, Katrina's birthday - Salman Khan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.