मी आमीरचा द्वेष करतो - सलमान खान

By Admin | Updated: December 23, 2016 11:54 IST2016-12-23T08:58:32+5:302016-12-23T11:54:59+5:30

मिस्टर परफेक्शनिस्ट आमीर खानचा द्वेष करतो, असे ट्विट बॉलिवूडचा दबंग सलमान खानने केले आहे.

I hate Aamir - Salman Khan | मी आमीरचा द्वेष करतो - सलमान खान

मी आमीरचा द्वेष करतो - सलमान खान

>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 23 -  बॉलिवूडचा दबंग सलमान खान मिस्टर परफेक्शनिस्ट आमीर खानचा द्वेष करतो, हे आम्ही नाही तर स्वतः सल्लूमियाँने म्हटले आहे. सलमानने ट्विट करत सांगितले आहे की, तो आमीर खानचा द्वेष करतो. मात्र हे द्वेष ट्विट काही स्पर्धेसाठी नाही तर त्याच्या बॉलिवूडमधील कामगिरीबाबत कौतुक करण्यासाठी केले आहे.  शुक्रवारी रात्री सलमानने ट्विट करत सांगितले की, 'माझ्या कुटुंबीयांनी आमीरचा दंगल सिनेमा पाहिला आणि त्यांना हा सिनेमा सुलतान सिनेमापेक्षा अधिक चांगला वाटला'.
 
याच ट्विटमध्ये आमीरचे कौतुक करत त्यांने खासगी आयुष्यात त्याचं आमीरवर खूप प्रेम आहे,  मात्र व्यावसायिकदृष्ट्या त्याचा द्वेष करत असल्याचे सांगितले आहे. दरम्यान, आमीर खानचा बहुप्रतिक्षित आणि बहुचर्चित 'दंगल' सिनेमा बॉक्सऑफिसवर झळकला आहे.  आमीरने सिनेमामध्ये महावीर फोगट यांची भूमिका साकारली असून फोगट यांनी आपल्या दोन मुली गीता आणि बबिता यांना कशाप्रकारे कुस्तीचे प्रशिक्षण दिले, याची कथा मोठ्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे. 
 
(दंगल - मुलींविषयीच्या मानसिकतेवर प्रभावी भाष्य)

Web Title: I hate Aamir - Salman Khan