...तर लग्नाआधी आई होण्यात मला प्रॉब्लेम नाही - श्रृती हसन

By Admin | Updated: May 28, 2017 10:01 IST2017-05-28T10:01:50+5:302017-05-28T10:01:50+5:30

लोक काय म्हणतील, मीडिया काय म्हणेल याचा मला काहीच फरक पडत नसल्याचे श्रृती म्हणाली.

I do not have a problem before getting married - Shruti Hassan | ...तर लग्नाआधी आई होण्यात मला प्रॉब्लेम नाही - श्रृती हसन

...तर लग्नाआधी आई होण्यात मला प्रॉब्लेम नाही - श्रृती हसन

tyle="text-align: justify;">ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि.28 - मी लग्नाचा अजून विचार केलेला नाही. पण जर योग्य लाइफ पार्टनर मिळाला तर लग्नाअगोदर मुलांना जन्म देण्यात मला काही प्रॉब्लेम नाही असे वक्तव्य कमल हसनची मुलगी श्रृती हसनने केले आहे. एका कार्यक्रमादरम्यान ती बोलत होती. लोक काय म्हणतील, मीडिया काय म्हणेल याचा मला काहीच फरक पडत नसल्याचे श्रृती म्हणाली. श्रृतीच्या या एकदम बोल्ड आणि बिनधास्त वक्तव्यामुळे तिच्यावर टीकेची झोड पडत आहे, त्यामुळे ती अडचणीत पडण्याची शक्यता आहे.
श्रुती सध्या ब्रिटिश आर्टिस्ट मायकलला डेट करीत आहे. मात्र श्रुतीने कधीही तिच्या या नात्याबद्दल कुठेच आफिशियली खुलासा केला नाही. एका मुलाखतीदरम्यान तिने सांगितले होते की, ती एका म्युझिक डायरेक्टरला लाइक करत होती. तिने पुढे सांगितले की, ते दोघेही एकमेकांच्या खूपच जवळ आले होते, मात्र त्यांचा ब्रेकअप झाला आणि तिला त्यावेळी जाणिव झाली की, हे केवळ एक आकर्षण होते.
विशेष म्हणजे श्रृतीदेखील तिचे आई वडील सारिका आणि कमल हासन यांच्या लग्नाआधीच जन्मली होती. तिच्या जन्मानंतर दोघांनी लग्न केले होते

Web Title: I do not have a problem before getting married - Shruti Hassan