"दुसऱ्याच महिन्यात रंगेहाथ पकडलं...!" धनश्री वर्माचा खळबळजनक खुलासा, युजवेंद्र चहलनं लग्नाच्या पहिल्याच वर्षात दिला होता धोका?
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 29, 2025 19:25 IST2025-09-29T19:23:55+5:302025-09-29T19:25:39+5:30
Dhanashree Verma : हा खुलासा धनश्रीने शोमधील दुसरी स्पर्धक कुब्रा सैत हिच्याशी ब्रेकफास्ट टेबलवर झालेल्या संभाषणादरम्यान केला. या संभाषणाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

"दुसऱ्याच महिन्यात रंगेहाथ पकडलं...!" धनश्री वर्माचा खळबळजनक खुलासा, युजवेंद्र चहलनं लग्नाच्या पहिल्याच वर्षात दिला होता धोका?
एमएक्स प्लेयरवरील लोकप्रिय रिअॅलिटी शो 'राइज अँड फॉल' सध्या जबरदस्त चर्चेत आहे. यावेळी शोची स्पर्धक धनश्री वर्मा (Dhanashree Verma) तिच्या वैवाहिक आयुष्यासंदर्भात धक्कादायक खुलासा करत पुन्हा चर्चेत आली आहे. आपल्याला लग्नानंतर दुसऱ्याच महिन्यात पतीकडून धोका मिळाल्याचा दावा धनश्रीने केला आहे. महत्वाचे म्हणजे, तिने स्वत:च पतीला धोखा देताना रंगेहाथ पकडल्याचे म्हटले आहे. हा खुलासा तिनी शोमधील दुसरी स्पर्धक कुब्रा सैत हिच्याशी ब्रेकफास्ट टेबलवर झालेल्या संभाषणादरम्यान केला. या संभाषणाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
या व्हिडिओमध्ये, धनश्री वर्मा आणि कुब्रा सैत डायनिंग टेबलवर नाश्ता करताना दिसत आहेत. दरम्यान, कुब्राने धनश्रीला विचारले, “तुला कधी जाणवले की तू ज्या नात्यात आहेस, ते आता चालणार नाही, चूक झाली आहे?” यावर धनश्रीने कुणाचेही नाव न घेता, “पहिल्याच वर्षी, लग्नाच्या दुसऱ्या महिन्यातच मी त्याला रंगेहाथ पकडले,” असे सांगितले. धनश्रीच्या या खुलाशाने कुब्रा सैतलाही धक्का बसला. धनश्रीचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
लग्नाच्या चार वर्षांनंतर घटस्फोट --
धनश्री वर्मा आणि युजवेंद्र चहल यांनी डिसेंबर २०२० मध्ये लग्न केले होते. मात्र, लग्नानंतर अवघ्या चार वर्षांतच त्यांच्या नात्यात दुरावा निर्माण झाल्याच्या बातम्या येऊ लागल्या. अखेर मार्च २०२५ मध्ये दोघांनी अधिकृतपणे घटस्फोट घेतला.