ह्रितिक रोशनचा मुलांसोबत टाईमपास

By Admin | Updated: March 19, 2016 19:34 IST2016-03-19T19:27:37+5:302016-03-19T19:34:26+5:30

ह्रितिकने ट्विटरवर आपल्या मुलांसोबत एक व्हिडिओ शेअर केला आहे ज्यामध्ये तोंड वेडेवाकडे करुन दाखवत आहेत

Hrithik Roshan's Tiampass with the kids | ह्रितिक रोशनचा मुलांसोबत टाईमपास

ह्रितिक रोशनचा मुलांसोबत टाईमपास

ऑनलाइन लोकमत - 
मुंबई, दि. १९ - अभिनेत्री कंगना राणावतसोत सुरु असलेल्या भांडणामुळे अभिनेता ह्रितिक रोशन सध्या चर्चेत आहे आहे. आजपर्यंत कोणत्याही वादात न अडकलेल्या ह्रितिक रोशनची या प्रकरणामुळे चांगलीच नाचक्की झाली आहे. प्रसारमाध्यमांपासून ते सोशल मिडियापर्यत सगळीकडे ह्रितिक रोशन आणि कंगना राणावतच्या अफेअरची आणि भांडणाची चर्चा सुरु आहे. दोघेही एकमेकांवर टीका करत सुटले आहेत. एकीकडे हे टेंशन असताना ह्रितिक रोशन आपल्या मुलांना या सगळ्यापासून लांब ठेवत असल्याचं दिसत आहे. 
 
नुकताच ह्रितिकने ट्विटरवर आपल्या मुलांसोबत एक व्हिडिओ शेअर केला आहे ज्यामध्ये तोंड वेडेवाकडे करुन दाखवत आहेत. ह्रितिकने आपल्या फॉलोअर्सनादेखील असे वेडेवाकडे तोंड करुन फोटो पाठवण्यास सांगितलं आहे. अभिनेता अनिल कपूर यांनीदेखील आपला एक फोटो पाठवला आहे. ज्याच्यावर ह्रितिकने झकास म्हणून कमेंटदेखील केली आहे.
 
 


Web Title: Hrithik Roshan's Tiampass with the kids