शक्तीमान मालिकेत यादगार भूमिका साकारणारे हे 6 कलाकार आता कसे दिसतात!
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 14, 2018 16:27 IST2018-06-14T16:24:59+5:302018-06-14T16:27:01+5:30
मालिकेचे डायलॉग, त्यातील कलाकार आजही अनेकांच्या लक्षात असतील. फक्त बदल झालाय तो या मालिकेतील कलाकारांच्या लूकमध्ये. चला जाणून घेऊया या मालिकेतील कलाकार आता कसे दिसतात.

शक्तीमान मालिकेत यादगार भूमिका साकारणारे हे 6 कलाकार आता कसे दिसतात!
मुंबई : 90च्या काळातील सर्वात जास्त गाजलेल्या मालिकांपैकी एक मालिका म्हणजे शक्तीमान. या मालिकेने अनेक वर्ष लहानांसोबतच मोठ्यांच्याही मनावर राज्य केलं. आजही या मालिकेचा विषय निघाला की, अनेकांना जुन्या गोष्टी आठवतात. शक्तीमान असा पहिला सुपरहिरो होता जो शत्रूंचा खात्मा करण्यासोबतच लहान मुलांना शिक्षणही देत होता. त्यामुळेच ही मालिका गाजली होती.
त्यानंतर किती सुपरहिरो आले, पुढे येतील पण शक्तीमानमध्ये जी गोष्ट होती ती इतर सुपरहिरोमध्ये नक्कीच नसणार. या मालिकेचे डायलॉग, त्यातील कलाकार आजही अनेकांच्या लक्षात असतील. फक्त बदल झालाय तो या मालिकेतील कलाकारांच्या लूकमध्ये. चला जाणून घेऊया या मालिकेतील कलाकार आता कसे दिसतात.
1) मुकेश खन्ना - शक्तीमान
गंगाधर विद्याधर मायाधर ओंकारनाथ शास्त्री ऊर्फ शक्तीमानची भूमिका साकारणारे मुकेश खन्ना हे आता 59 वयाचे आहेत. मुकेश खन्ना यांनी अनेक बॉलिवूड सिनेमांमध्ये वेगवेगळ्या भूमिका साकारल्या आहेत पण या मालिकेने त्यांना अफाट लोकप्रियता दिली.
2) वैष्णवी महांत - गीता विश्वास
शक्तीमान या मालिकेत शक्तीमानच्या प्रेमिकेच्या भूमिकेत वैष्णवी दिसली होती. आता वैष्णवी ही 43 वर्षांची आहे. शक्तीमाननंतर तिने 'टशन-ए-इश्क', 'सपने सुहाने लडकपन के' या मालिकांमध्ये काम केले. अजूनही काही मालिकांमध्ये ती दिसते.
3) ललित परिमू - डॉक्टर जैकॉल
शक्तीमान या मालिकेत सर्वात शक्तीमाननंतर सर्वात गाजलेली भूमिका म्हणजे डॉक्टर जैकॉल. ललित परिमू यांनी ही भूमिका साकारली होती. त्यांची ही भूमिका आजही अनेकांच्या स्मरणात आहे.
4) अश्विनी काळसेकर - शलाका
अश्विनीने या मालिकेत काळी मांजर शलाकाची भूमिका साकारली होती. 48 वर्षीय अश्विनी छोट्या पडद्यावर निगेटीव्ह भूमिका साकारण्यासाठी प्रसिद्ध आहे.
5) सुरेंद्र पाल - तमराज किलविश
'अंधेरा कायम रहे' असं अजूनही अदूनमधून तुम्ही ऐकत असाल किंवा स्वत: म्हणत असाल. ही टॅगलाईन ज्यांच्यासाठी होती त्या तमराज किलविशची भूमिका सुरेंद्र पाल यांनी साकारली होती. सुरेंद्र पाल यांनी या मालिकेत फारच मस्त काम केलं होतं. त्यासाठी त्यांना अनेक पुरस्कारही देण्यात आले होते.
6) प्रोफेसर विश्वास - राजेंद्र गुप्ता
73 वर्षीय राजेंद्र गुप्ता यांनी शक्तीमानमध्ये गीता विश्वासच्या वडिलांची भूमिका साकारली होती. त्यासोबतच राजेंद्र यांनी अनेक सिनेमांमध्येही लक्षात राहतील अशा भूमिका साकारल्या आहेत.