दीपिकाच्या त्या हॉट फोटोमुळे चाहते नाराज

By Admin | Updated: June 9, 2017 23:30 IST2017-06-09T21:06:51+5:302017-06-09T23:30:37+5:30

दंगलस्टार फातिमा शेखच्या बिकीनी फोटोशूटवर सोशल मीडिया यूझर्सनी तोंडसुख घेतल्याचा प्रकार ताजा असतानाच दीपिकाने हॉट फोटो शेअर केला.

The hot photos of Deepika are annoyed by the fans | दीपिकाच्या त्या हॉट फोटोमुळे चाहते नाराज

दीपिकाच्या त्या हॉट फोटोमुळे चाहते नाराज

tyle="text-align: justify;">ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 9 - दंगलस्टार फातिमा शेखच्या बिकीनी फोटोशूटवर सोशल मीडिया यूझर्सनी तोंडसुख घेतल्याचा प्रकार ताजा असतानाच दीपिकाने हॉट फोटो शेअर केला. त्यामुळे दीपिकालाही सोशल मीडियावर ट्रोलिंगचा सामना करावा लागला आहे. अभिनेत्री दिपीका पदुकोणने आपल्या इन्स्टाग्राम वर एका हॉट फोटो पोस्ट केला आहे. या फोटोने इंटरनेटवर धुमाकुळ घातला आहे. दिपिकाने या फोटोत पांढरा टू पीस परिधान केला आहे. ती अशा अवतारात या फोटोमध्ये असल्याने तिच्यावर टीकेची झोड उठवली जात आहे. तिच्या काही चाहत्यांनी इन्स्टाग्रामवरील या फोटोचे जरी कौतुक केले असले तरी एक भारतीय महिला म्हणून तिच्याकडून अशी अपेक्षा नव्हती असा सूर काही जणांनी लावला आहे. दुसऱ्याएक नेटीझन्सने असे म्हटले आहे की, दीपिका आम्हाला तुझ्याकडून ही अपेक्षा नाही, भारतीय संस्कृतीची लाज राख, हॉलिवूडला जाऊन तुला संस्कारांचा विसर पडला का, आम्हाला तुझी लाज वाटते, तुझा धिक्कार असो.
दीपिकाने अलीकडेच मॅक्झीन या पुस्तकासाठी फोटो शूट केले होते. त्यातीलच एक फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केला आहे. त्याला जस्ट पोस्टेड ए फोटो असे कॅप्शन तिने दिले आहे.

प्रियंका चोप्राने अलीकडेच नरेंद्र मोदी यांच्या भेटीच्यावेळी परिधान केलेल्या वस्त्रांमुळे तिला चाहत्यांचा रोश पत्करावा लागला होता.

 

Web Title: The hot photos of Deepika are annoyed by the fans