कॅटरिनाचा हॉट फोटो इन्स्टाग्रामवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2017 23:27 IST2017-04-28T23:27:37+5:302017-04-28T23:27:37+5:30

पेरुव्हियन फोटोग्राफर मारिओ टेस्टिनो यांनी शूट केलेले टॉवेल सिरिजमधील फोटो तिने इन्स्टाग्राम या फोटो शेअरिंग साइटवर अपलोड केला आहे.

Hot Photo Instagram on Catarina | कॅटरिनाचा हॉट फोटो इन्स्टाग्रामवर

कॅटरिनाचा हॉट फोटो इन्स्टाग्रामवर

>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 28 -   बॉलीवूडची आघाडीची अभिनेत्री कॅटरिना कैफ हिने नुकतेच इन्स्टाग्रामवर पदार्पण केलं आहे. पेरुव्हियन फोटोग्राफर मारिओ टेस्टिनो यांनी शूट केलेले टॉवेल सिरिजमधील फोटो तिने इन्स्टाग्राम या फोटो शेअरिंग साइटवर अपलोड केला आहे.
33 वर्षीय कॅटरिना कैफने अपलोड केलेला फोटा इतरांना आकर्षित करणारा आहे. दरम्यान, या फोटोखाली तिने कॅप्शन लिहिली असून फोटोग्राफर मारिओ टेस्टिनोला धन्यवाद दिले आहेत. मारिओ टेस्टिनो यांनी कॅटरिना कैफ हिच्यासह आंतरराष्ट्रीय सेलिब्रिटी ब्रिटनी स्पेअर्स, क्रिस्टन स्टीवर्ट, सेलेना गोमेज आणि केंडल जेनर यांचेही टॉवेल सिरिजमध्ये फोटोशूट केले आहेत. गेल्या जानेवारी महिन्यात मारिओ टेस्टिनो भारत भेटीवर आले होते. 
कॅटरिना कैफने अकाउन्ट ओपन केल्यानंतर अवघ्या काही तासातच ती हीट झाली.  तिचे 24 तासात नऊ लाख फॉलोअर्स झाले आहेत. बॉलिवूड सेलिब्रिटी सलमान खान, अलिया भट्ट, अक्षय कुमार आणि सिद्धार्थ मल्होत्रा यांनी तिचे इन्स्टाग्रामवर आल्याबद्दल स्वागत केले आहे.  
 

Thank you @mariotestino for the wonderful experience of shooting for the legendary #TowelSeries ... You must come see us again soon . Here u go @anaitashroffadajania

Web Title: Hot Photo Instagram on Catarina