करणने शेअर केला बिपाशाचा हनिमूनचा 'हॉट' फोटो

By Admin | Updated: May 11, 2016 14:57 IST2016-05-11T13:38:05+5:302016-05-11T14:57:10+5:30

बिपाशा बासू आणि करणसिंह ग्रोव्हर इन्स्टाग्रामवर फोटोंच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांना हनिमूनच्या अपडेट देत आहेत.

Honeymoon's 'Hot' photo of Bipasha shared by Karan | करणने शेअर केला बिपाशाचा हनिमूनचा 'हॉट' फोटो

करणने शेअर केला बिपाशाचा हनिमूनचा 'हॉट' फोटो

tyle="text-align: justify;">ऑनलाइन लोकमत 
मुंबई, दि. ११ - लग्नानंतर मालदीवला हनिमूनसाठी गेलेले बिपाशा बासू आणि करणसिंह ग्रोव्हर इन्स्टाग्रामवर फोटोंच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांना हनिमूनच्या अपडेट देत आहेत. करणने बिपाशाचा एक हॉट फोटो इन्स्टाग्रामवर अपलोड केला आहे. त्यावर माझी पत्नी देवता असून, मी भाग्यवान आहे असा संदेश लिहीला आहे.
 
बिपाशानेही करणचे आभार मानताना आपण दोघे भाग्यवान आहोत असे म्हटले आहे.  ३० एप्रिलला आयुष्यभरासाठी लग्नाच्या बेडीत अडकलेले बिपाशा आणि करण मालदीवच्या समुद्रकिना-यांवर हनिमूनचा आनंद लुटत आहेत. 
 
दोन दिवसांपूर्वी बिपाशाने निवांत सागराचे फोटो तिच्या इन्स्टाग्रामवर अपलोड केले होते. आता करणने बिपाशाचा हॉट फोटो अपलोड केला आहे. ते ज्या रिसॉर्टमध्ये उतरले आहेत तिथेही त्यांची खास व्यवस्था करण्यात आली आहे.

Web Title: Honeymoon's 'Hot' photo of Bipasha shared by Karan