मराठमोळ्या सनीची हॉलिवूडवारी

By Admin | Updated: December 30, 2016 03:31 IST2016-12-30T03:31:57+5:302016-12-30T03:31:57+5:30

'लायन' या हॉलिवूड चित्रपटात आठ वर्षाचा मराठमोळ्या सनी पवार हा झळकणार आहे. गार्थ डेव्हीस दिग्दर्शित हा चित्रपट आहे. सनी पवारने या चित्रपटात अप्रतिम काम केले आहे.

Honeymoon Sunny Hollywood | मराठमोळ्या सनीची हॉलिवूडवारी

मराठमोळ्या सनीची हॉलिवूडवारी

'लायन' या हॉलिवूड चित्रपटात आठ वर्षाचा मराठमोळ्या सनी पवार हा झळकणार आहे. गार्थ डेव्हीस दिग्दर्शित हा चित्रपट आहे. सनी पवारने या चित्रपटात अप्रतिम काम केले आहे. 8 हजार मुलांचे आॅडिशन घेऊन सनीची निवड करण्यात आली. अभिनयाची कोणतीही पार्श्वभूमी नसलेल्या आणि इंग्रजी भाषेचे ज्ञान नसलेल्या सनीने केवळ आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. 'लायन' चित्रपटाची 'गोल्डन ग्लोब अवॉर्ड'च्या चार विभागांमध्ये निवड झाली आहे. भारतात घडलेल्या सत्यकथेवर आधारित हा चित्रपट आहे. आपल्या भावासह रेल्वे स्टेशनवर पोहोचलेला पाच वर्षांचा गरीब मुलगा चुकून रेल्वेमध्ये झोपतो आणि गाडी सुटते. जाग येईपर्यंत हा मुलगा कोलकात्त्याला पोहोचलेला असतो. कोलकात्त्यातून एक आॅस्ट्रेलियन कुटुंब त्याला दत्तक घेते. २५ वषार्नंतर हा मुलगा आपल्या हरवलेल्या कुटुंबियांचा शोध घ्यायला सुरुवात करतो अशी या चित्रपटाची कथा आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत रॉनी मारा आणि अभिनेता देव पटेल या कलाकारांचादेखील समावेश आहे.

Web Title: Honeymoon Sunny Hollywood