विकिलीक्सच्या संस्थापकाने पामेलासोबतचे संबंध केले उघड
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2017 22:16 IST2017-02-17T16:46:23+5:302017-02-17T22:16:23+5:30
विकिलीक्सचे संस्थापक जुलियन असांजे आणि पामेला एंडरसन यांच्यातील रोमान्सच्या चर्चेला पूर्णविराम दिला आहे. जुलियनने स्पष्ट शब्दात सांगितले की, ते ...
.jpg)
विकिलीक्सच्या संस्थापकाने पामेलासोबतचे संबंध केले उघड
व किलीक्सचे संस्थापक जुलियन असांजे आणि पामेला एंडरसन यांच्यातील रोमान्सच्या चर्चेला पूर्णविराम दिला आहे. जुलियनने स्पष्ट शब्दात सांगितले की, ते पामेलाला पसंत करतात.
डेलीमेल डॉट कॉ डॉट यूके या वेबसाइटने दिलेल्या माहितीनुसार, जुलियन असांजने एका रेडिओला मुलाखत देताना म्हटले की, मला पामेला आवडते, ती खूपच आकर्षक आहे. जगातील प्रभावशाली व्यक्तिमत्त्वांपैकी पामेला आहे. तिला कोणीही वेड्यात काढू शकत नाही. कारण पामेला मानसिक परिपक्व असलेले व्यक्तिमत्त्व आहे. त्यामुळेच मी तिला प्रचंड पसंत करतो. पामेला याविषयावर मी अधिक खोलवर जाऊ इच्छित नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
![]()
असांजे आणि पामेला यांच्यातील रोमान्सच्या चर्चा पामेलाच्या लंडन येथील इक्वाडोर येथील दुतावासात गेल्यावर सुरू झाल्या. असांजेला २०१२ नंतर त्याठिकाणी राजकीय शरण दिली गेली. २०१० मध्ये स्वीडन दौºयादरम्यान त्यांच्यावर बलात्काराचा आरोप लावण्यात आला होता. ‘बेवॉच’ स्टार पामेलाने नुकतेच असांजेसोबत वेळ घालवलेले आवडत असल्याचे म्हटले होते. पामेलाच्या या वक्तव्यामुळे दोघांमध्ये काहीतरी शिजत असल्याची चर्चा रंगली होती.
अखेर या चर्चेला आता पूर्णविराम देण्यात आला असून, असांजे यांनीच पामेला आवडत असल्याचे स्पष्ट केले आहे. असांजेचा हा खुलासा खळबळजनक समजला जात आहे. आता यावर पामेला काय उत्तर देणार हे बघणे औत्सुक्याचे ठरेल.