मायकेल समलैंगिक असल्याचा पत्नीचा समज
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 4, 2016 17:52 IST2016-11-04T17:52:02+5:302016-11-04T17:52:02+5:30
गायक मायकल बबल याने एक खळबळजनक खुलासा केला आहे. जेव्हा त्याची पहिल्यांदाच अभिनेत्री पत्नी लुसियाना लोपिलातो हिच्याशी भेट झाली ...

मायकेल समलैंगिक असल्याचा पत्नीचा समज
ग यक मायकल बबल याने एक खळबळजनक खुलासा केला आहे. जेव्हा त्याची पहिल्यांदाच अभिनेत्री पत्नी लुसियाना लोपिलातो हिच्याशी भेट झाली होती, तेव्हा तिने त्याला समलैगिंक समजले होते.
एका वेबसाइटने दिलेल्या माहितीनुसार ४१ वर्षीय मायकलने सांगितले की, २९ वर्षीय लुसियानाला पूर्ण खात्री होती की, मायकल तिच्यावर नव्हे तर तिच्या मित्राकडे अधिक आकर्षित आहे. पहिल्या भेटीच्या आठवणींना उजाळा देताना मायकलने म्हटले की, जेव्हा मी लुसियानाला भेटलो तेव्हा तिच्याबरोबर तिचा मित्रही होता. तो खरोखरच खूप सुंदर होता. ब्रॅड पिट सुद्धा त्याच्यासमोर एवढा प्रभावी वाटत नसावा. बघितल्याबरोबरच तो तिचा पती किंवा बॉयफ्रेंड असावा असा मी अंदाज लावला होता. त्यामुळे त्याच्याशी मैत्री करण्यास मी नकार दिला.
मी लुसियानाला म्हटले होते की, तुमची जोडी खूपच सुंदर आहे. मात्र लुसियानाने स्पष्ट केले की, आमच्यात केवळ मित्रत्त्वाचे नाते आहे. लुसियानाचे वाक्य संपताच तिच्या बॉयफ्रेंडने सांगितले की, आम्ही येथे येण्याचे कारण म्हणजे लुसियाना तुम्हाला खूप पसंत करतेय. आमचा संवाद सुरू असतानाच लुसियाना मोबाइलवर तिच्या आईला मेसेज टाइप करीत होती. त्यामध्ये तिने लिहले होते की, ‘अरे देवा... मायकल बबल माझ्यावर नव्हे तर माझ्या मित्रावर फिदा आहे. तो समलैंगिक आहे’
विशेष म्हणजे मायकल आणि लुसियाना यांना दोन मुले असून, त्यांचा सुखाचा संसार सुरू आहे. त्याचा मोठा मुलगा नेह तीन वर्षाचा, तर इलियास दहा महिन्याचा आहे. दोघेही एकमेकांसोबत खुश आहेत.