‘आॅस्कर’मध्ये कोणाला मिळाले नामांकन अन् कोण आहे रेसमध्ये; वाचा सविस्तर...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2017 17:52 IST2017-02-25T12:22:51+5:302017-02-25T17:52:51+5:30

जागतिक सिनेमाचा सर्वाधिक प्रतिष्ठित समजल्या जाणाºया ८९व्या आॅस्कर अवॉर्डस सोहळ्याचे काउंटडाउन सुरू झाले आहे. येत्या रविवारी (दि.२६) कॅलिफोर्निया स्थित ...

Who has got an Oscar nomination and who is in the race; Read details ... | ‘आॅस्कर’मध्ये कोणाला मिळाले नामांकन अन् कोण आहे रेसमध्ये; वाचा सविस्तर...

‘आॅस्कर’मध्ये कोणाला मिळाले नामांकन अन् कोण आहे रेसमध्ये; वाचा सविस्तर...

गतिक सिनेमाचा सर्वाधिक प्रतिष्ठित समजल्या जाणाºया ८९व्या आॅस्कर अवॉर्डस सोहळ्याचे काउंटडाउन सुरू झाले आहे. येत्या रविवारी (दि.२६) कॅलिफोर्निया स्थित लॉज एंजेलिस येथील डॉल्बी थिएटरमध्ये पार पडणाºया या सोहळ्यात जगातील सर्वोत्कृष्ट सिनेमांचा गौरव केला जाणार आहे. या सोहळ्यात कोणी बाजी मारली अन् कोणाला नामांकन मिळालेत याची इत्यंभुत माहिती खास ‘सीएनएक्स’च्या वाचकांसाठी...



८९ व्या आॅस्कर सोहळ्यात तब्बल १४ नामांकने मिळालेल्या म्युझिकल ‘ला ला लॅँड’कडे सगळ्यांच्याच नजरा लागून आहेत. कारण ‘ला ला लॅँड’ विविध श्रेणींमध्ये सर्वाधिक नामांकने मिळालेला पहिला सिनेमा ठरला आहे. या सिनेमाला याच महिन्यात पार पडलेल्या ‘ब्रिटिश फिल्म अवॉर्डस बाफ्टा २०१७’ मध्ये पाच अवॉर्डस देऊन सन्मानित करण्यात आले होते. ज्यामध्ये बेस्ट फिल्म, डेमियन चाजेल यांना बेस्ट डायरेक्टर, एमा स्टोन हिला बेस्ट अ‍ॅक्ट्रेस तसेच सिनेमेटोग्राफी आणि बेस्ट म्युझिकसाठी अवॉर्ड देण्यात आले. त्यामुळे आॅस्करमध्येही या सिनेमाची घौडदौड कायम राहणार अशी अपेक्षा केली जात आहे. 

तसेच बेस्ट अ‍ॅक्ट्रेस या श्रेणीमध्ये नामांकन मिळालेल्या ‘ला ला लॅँड’ची अभिनेत्री एमा स्टोन हिला मेरिल स्ट्रीप (फ्लोरेंस फोस्टर जेनिकन्स) फाइट देणार आहे. मात्र या कॅटेगिरीत नामांकन मिळाल्यानेच मेरिलने इतिहास रचला आहे. कारण मेरिल आॅस्करच्या इतिहासात पहिली अशी अभिनेत्री आहे, जिने तब्बल २० वेळा बेस्ट अ‍ॅक्ट्रेस या श्रेणीमध्ये नामांकन मिळवले आहे. नुकत्याच झालेल्या गोल्डन ग्लोब अवॉर्ड सोहळ्यात तिला लाइफ टाइम अ‍ॅचिव्हमेंट अवॉर्डने सन्मानित करण्यात आले होते. यावेळी तिने दिलेले भाषण जगभर गाजले होते.



तर बेस्ट अ‍ॅक्टर श्रेणीमध्ये ‘ला ला लॅँड’ या सिनेमाचाच अभिनेता रयान गोसलिंग प्रथम दावेदार समजला जात आहे. त्याला अफ्फ्लेक (मेनचेस्टर बाय थे सी), अ‍ॅँड्रयू गारफील्ड (हॅक्सावे रजी) आणि डेनजेल वाशिंग्टन (फेंसेस) हे टक्कर देणार आहेत. बेस्ट डायरेक्टर अवॉर्ड श्रेणीत नेहमीच वादग्रस्त वक्तव्य करून आॅस्कर अवॉडर्सला बायकॉट करणारे मेल गिब्सन यांना स्थान मिळाले आहे. ‘हॅक्सावे’ या सिनेमासाठी त्यांना हे नामांकन मिळाले आहे. मात्र त्यांना या कॅटेगिरीत आॅस्कर जिंकणे म्हणावे तेवढे सोपे नाही. कारण ‘ला ला लँड’चे डेमियन चाजेल आणि ‘मूनलाइट’चे बॅरी जेनिकन्स यांचा सामना करावा लागणार आहे. 

बेस्ट फिल्म कॅटेगिरीसाठी ‘ला ला लॅँड’ प्रथम दावेदार समजली जात आहे. त्याव्यतिरिक्त ‘अरायव्हल, फेंसेस, हॅक्सावे, रजि, लायन मूनलाइट’ या सिनेमात टक्कर होणार आहे. या आॅस्करची आणखी एक मजेशीर गोष्ट म्हणजे तब्बल दोन वर्षांनंतर एका कृष्णवर्णीय कलाकाराला नामांकन मिळाले आहे. अर्थातच भारतीय वंशाचा अभिनेता देव पटेल हे त्याचे नाव असून, त्याला बेस्ट सपोर्टिंग अभिनेता या कॅटेगिरीत स्थान मिळाले आहे. विशेष म्हणजे त्याला यासाठी प्रबळ दावेदारही समजले जात आहे. ‘लायन’मधील भूमिकेसाठी त्याला हे नामांकन मिळाले आहे. या व्यतिरिक्त या कॅटेगिरीत महेर्शाला अली (मूनलाइट), जेफ ब्रिजेस (हेल अ‍ॅण्ड हाय वॉटर) आणि लुकास हेजेज (मेनचेस्टर बाय थे सी) त्याला टक्कर देणार आहेत. 



नुकत्याच झालेल्या ब्रिटिश फिल्म अवॉडर्समध्ये देव पटेल याला लायनसाठी बेस्ट सपोर्टिंग अ‍ॅक्टर या अवॉर्डने गौरविण्यात आले होते. गार्थ डेविस यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘लायन’मध्ये देव पटेल याने अशा मुलाची भूमिका साकारलेली आहे, जो लहानपणी कोलकात्यात आपल्या परिवारापासून बेपत्ता होतो. मोठा झाल्यावर गुगलच्या आधारे तो त्याच्या परिवाराचा शोध घेतो. ‘लायन’ला आॅस्करमध्ये पाच श्रेणींमध्ये नामांकने मिळाले आहेत. ज्यामध्ये सर्वोत्कृष्ट सिनेमा, बेस्ट सपोर्टिंग अ‍ॅक्टर, बेस्ट म्यूझिक आणि सिनेमेटोग्राफी यांचा समावेश आहे. अर्थातच ही बाब भारतीयांसाठी अभिमानास्पद आहे. 

ग्लॅमरच्या बाबतीतदेखील या आॅस्करमध्ये भारताची छाप पडण्याची शक्यता आहे. कारण ८९व्या या आॅस्कर सोहळ्याच्या प्री-पार्टीत नुकतीच दीपिका पादुकोन हिने हजेरी लावली होती. तसेच गेल्यावर्षी आॅस्करमध्ये झळकलेली अभिनेत्री प्रियंका चोपडा याही वर्षी रेड कार्पेटवर आपला जलवा दाखविणार आहे. अशा या दिव्य भव्य आॅस्कर सोहळ्याचे लाइव्ह टेलीकास्ट १२१ देशांमध्ये २७ फेब्रुवारी रोजी सकाळी ५.३० वाजता केले जाणार आहे. 

Web Title: Who has got an Oscar nomination and who is in the race; Read details ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.