अश्लील फोटो पाठवून या अभिनेत्रीला ब्लॅकमेल करत होते काही युजर्स, तिने सुनावले खडेबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2019 19:10 IST2019-08-14T19:10:00+5:302019-08-14T19:10:00+5:30

या अभिनेत्रीनं न्यूड फोटो शेअर करून ब्लॅकमेल करणाऱ्यांना शिकविला धडा

Whitney Cummings Just Posted a Nude Photo on Twitter. It Was a Masterful Lesson in Emotional Intelligence | अश्लील फोटो पाठवून या अभिनेत्रीला ब्लॅकमेल करत होते काही युजर्स, तिने सुनावले खडेबोल

अश्लील फोटो पाठवून या अभिनेत्रीला ब्लॅकमेल करत होते काही युजर्स, तिने सुनावले खडेबोल


अमेरिकन अभिनेत्री विटनी कमिंग्स ही हॉलिवूडची अभिनेत्री, कॉमेडियन, निर्माती व लेखिका आहे. सध्या ती तिच्या फोटोंमुळे सोशल मीडियावर चर्चेत आहे. तिने तिच्या ट्विटर अकाउंटवर एक फोटो शेअर केला आहे, ज्यात तिचे ब्रेस्ट दिसत आहे. हा फोटो शेअर करण्यामागचे तिने कारण सांगितलं आहे.

 
 यावर्षी एप्रिल महिन्यात विटनीने हाच फोटो इंस्टाग्राम स्टोरीवर चुकून टाकला होता. जेव्हा तिच्या ही चूक लक्षात आली तेव्हा तिने तो फोटो डिलीट केला होता. मात्र यादरम्यान काही लोकांनी या फोटोचा स्क्रीनशॉट काढला आणि या फोटोच्या माध्यमातून तिला ब्लॅकमेल करायला सुरूवात केली. तिला हा फोटो शेअर करू नये म्हणून किती पैस मिळतील, असं काही युजर्सनं विचारलं.




याबद्दल तिने सांगितलं की, काही मला सांगत आहेत की त्यांच्याकडे हा फोटो विकत घेण्यासाठी ऑफर्स येत आहेत. तर काही फोटो शेअर करू नये म्हणून पैशांची मागणी करत आहेत. त्यांना हे समजलं पाहिजे की ते विचार करत आहेत त्यापेक्षा जास्त मी प्रसिद्ध आहे. मला धमकी देणं खूप सोप्पे आहे, असं त्यांना वाटतंय. 




विटनीने पुढे सांगितलं की, जेव्हा कोणत्या महिलेला पब्लिकली धमकवले जातं तेव्हा त्यांच्याशी डील करण्यासाठी आम्हाला वेळ, पैसे व एनर्जी खर्च करावी लागते. वकील घ्यावा लागतो. मनात ही भीती चालू असते की कधी व कसे आम्हाला अपमानित केले जाईल. तुमच्याकडे माझ्या ब्रेस्टचा फोटो असेल पण माझे पैसे व वेळ नसेल. जे लोक माझ्याकडून पैसे उकळण्याचा प्रयत्न करत आहेत, त्यांची मी नावं सांगणार नाही. पण त्यातील बरेचसे बालीश मुलं असतील.




विटनीच्या या ट्विटनंतर अमेरिकेतील काही लोक व कलाकार तिच्या सपोर्टमध्ये पुढे आले आहेत आणि ट्विटरवर हॅशटॅग #istandwithwhitney वापरून तिला पाठींबा दर्शवत आहेत.

कलाकार या हॅशटॅगच्या माध्यमातून आपले फोटो पोस्ट करत तिला पाठींबा दर्शवत आहेत.

Web Title: Whitney Cummings Just Posted a Nude Photo on Twitter. It Was a Masterful Lesson in Emotional Intelligence

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.