Watch Video : मच्छरला घाबरून लाइव्ह कॉन्सर्ट सोडून पळाली ‘ही’ गायिका
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2017 22:06 IST2017-03-08T16:36:26+5:302017-03-08T22:06:26+5:30
ग्रॅमी अवॉर्ड विजेती गायिका एडेले कधी तिच्या वजनामुळे तर कधी गाण्यांमुळे चर्चेत असते. यावेळेस मात्र ती भलत्याच कारणाने लाइमलाइटमध्ये ...

Watch Video : मच्छरला घाबरून लाइव्ह कॉन्सर्ट सोडून पळाली ‘ही’ गायिका
ग रॅमी अवॉर्ड विजेती गायिका एडेले कधी तिच्या वजनामुळे तर कधी गाण्यांमुळे चर्चेत असते. यावेळेस मात्र ती भलत्याच कारणाने लाइमलाइटमध्ये आली आहे. आॅस्ट्रेलियामध्ये आयोजित केलेल्या एका कॉन्सर्टदरम्यान ती चक्क मच्छरला घाबरून पळून गेली. अचानकच हा सर्व प्रकार घडल्याने उपस्थित लोकही आश्चर्यचकित झाले.
वीकली एंटरटेन्मेंटने दिलेल्या माहितीनुसार २८ वर्षीय गायिका एडेलेला किटकांची प्रचंड भीती वाटते. मग ते मच्छर जरी असले तरी, तिची भंबेरी उडून जाते. त्यामुळे कॉन्सर्टदरम्यान जेव्हा तिच्यासमोर काही मच्छर उडत होते, तेव्हा तिने स्टेजवरून खाली उतरत बाहेर जाण्याचा प्रयत्न केला. एडेलेची ही अवस्था बघून आयोजकांची मात्र पूर्ती दमछाक झाली. त्यांनी लगेचच तिच्याकडे धाव घेत प्रकार समजून घेतला. जेव्हा हीच बाब उपस्थितांना कळाली तेव्हा मात्र एकच हशा पिकला.
मग एडेलेने याविषयी खुलासा करणे अधिक संयुक्तिक समजले. तिने स्टेजवर फिरताना म्हटले की, मला माफ करा मी आॅस्ट्रेलियात नवी आहे. मला कुठलेच किटक अजिबात आवडत नाहीत, स्टेजवर असलेले मच्छर माझे रक्त पित असून, ते मला मारण्याचा प्रयत्न करीत असल्याचे तिने म्हणताच प्रेक्षकांना हसू आवरणे मुश्कील झाले होते.
गेल्या नोव्हेंबर २०१६ मध्येदेखील एडेलेला मॅक्सिको सिटीमध्ये अशाच प्रकारच्या प्रसंगाचा सामना करावा लागला होता. कारण त्यावेळेस तर चक्क स्टेजभोवती वटवाघुळ घिरट्या घालत होते. जेव्हा ही बाब एडेलेच्या लक्षात आली होती, तेव्हा मात्र तिने कार्यक्रमातून पळ काढला. आयोजकांनी त्या वटवाघुळाला हुसकल्यानंतर पुन्हा ती स्टेजवर आली; मात्र यावेळेस ती चांगलीच घाबरलेली असल्याचे बघावयास मिळाले होते.

"Adele cancelled a mosquito's life after it came for her legendary blood mid-concert." - @BuzzFeedpic.twitter.com/pzx0iozfmV— Adele Now (@AdeleNowuk) March 7, 2017 ">http://
}}}}"Adele cancelled a mosquito's life after it came for her legendary blood mid-concert." - @BuzzFeedpic.twitter.com/pzx0iozfmV— Adele Now (@AdeleNowuk) March 7, 2017