सनीच्या अदाकारीचा जलवा त्याचे कुटुंबीय अनुभवणार, 'लायन' सिनेमाचे मुंबईत होणार स्पेशल स्क्रीनिंग

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 1, 2017 17:41 IST2017-03-01T06:53:01+5:302017-03-01T17:41:56+5:30

मुंबईच्या झोपडपट्टीतून थेट ऑस्कर सोहळ्यात आपली छाप पाडणारा मुंबईकर बालकलाकार सनी पवारवर जगभरातून कौतुकाचा वर्षाव झाला. सनीनं भूमिका केलेल्या ...

Sunny will be seen in the film, Lion will be screened in Mumbai | सनीच्या अदाकारीचा जलवा त्याचे कुटुंबीय अनुभवणार, 'लायन' सिनेमाचे मुंबईत होणार स्पेशल स्क्रीनिंग

सनीच्या अदाकारीचा जलवा त्याचे कुटुंबीय अनुभवणार, 'लायन' सिनेमाचे मुंबईत होणार स्पेशल स्क्रीनिंग

ंबईच्या झोपडपट्टीतून थेट ऑस्कर सोहळ्यात आपली छाप पाडणारा मुंबईकर बालकलाकार सनी पवारवर जगभरातून कौतुकाचा वर्षाव झाला. सनीनं भूमिका केलेल्या ‘लायन’ सिनेमाला ऑस्करचं नॉमिनेशन मिळालं होतं. सनीच्या अभिनयाची झलक जगभरातल्या रसिकांनी अनुभवली आहे. आता सनीच्या अदाकारीचा जलवा त्याचे कुटुंबीय तसंच मुंबईच्या शाळेतील विद्यार्थी, शिक्षक आणि इतर कर्मचा-यांना पाहायला मिळणार आहे. त्यांच्यासाठी सनीच्या अभिनयाची जादू असलेल्या लायन सिनेमाचा विशेष प्रिमीयर सोहळा आयोजित करण्यात आला आहे.मुंबईतल्या कलिना परिसरातील एका झोपडपट्टीत छोट्याशा घरात राहणारा सनी एअर इंडिया मॉर्डन स्कूलमध्ये शिकतोय.त्यामुळे या शाळेतील शिक्षक आणि कर्मचारी यांच्यासाठी हा क्षण तितकाच खास असणार आहे. कारण सनी हा या शाळेचा पहिला विद्यार्थी आहे ज्याने शाळेचे नाव देशातच नाही तर जगभरात उंचावलं आहे. या प्रिमीयरच्या माध्यमातून जगभरातील रसिकांच्या कौतुकास पात्र ठरलेल्या आपल्या लाडक्या सनीच्या अभिनयाची जादू या सा-यांना या प्रिमीयरच्या माध्यमातून अनुभवता येणार आहे.  
 
सनीच्या 'लायन' या सिनेमाला ऑस्करमध्ये नॉमिनेशन मिळालं होतं. या सिनेमात सनीने अभिनेता देव पटेलची बालपणीची भूमिका साकारली होती. ही भूमिका साकारत असताना सनी अवघ्या सहा वर्षाचा होता.या सिनेमाची कथा भितीदायक असूनही सनीने ती भूमिका मोठ्या खुबीने साकारल्याने तो कौतुकास पात्र ठरला होता.ऑस्करच्या रेड कार्पेटवर चिमुकल्या सनी पवारचा जलवा पाहायला मिळाला.हॉलीवुडच्या दिग्गज कलाकारांपासून ते हॉलीवुडचे रसिक आणि माध्यमांच्या नजरा सनीनं आपल्याकडे आकर्षित केल्या होत्या. ऑस्कर पुरस्कार सोहळ्यातल्या सनीच्या खोड्या सा-यांनीच पाहिल्या होत्या. आता जगभरातील रसिकांची मनं जिंकणारा सनी मुंबईत दाखल झाला असून आपले नातेवाईक आणि त्याचे मित्र, शाळेच्या शिक्षकांसह सा-यांना लहानग्या सनीच्या अभिनयाची जादू अनुभवता येणार आहे.  

Web Title: Sunny will be seen in the film, Lion will be screened in Mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.