सनी पवार मुंईत परतला, विमानतळावर येताच झाले जंगी स्वागत

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 1, 2017 10:22 IST2017-03-01T04:52:19+5:302017-03-01T10:22:19+5:30

'लायन' या सिनेमातील सनी पवारने नुकतीच ऑस्कर पुरस्कार सोहळ्याला हजेरी लावली होती.ऑस्करमध्ये या छोट्याशा सनी पावरच्या हजेरीने त्याचे देशभारता ...

Sunny Pawar returned to Muni, to arrive at the airport | सनी पवार मुंईत परतला, विमानतळावर येताच झाले जंगी स्वागत

सनी पवार मुंईत परतला, विमानतळावर येताच झाले जंगी स्वागत

'
;लायन' या सिनेमातील सनी पवारने नुकतीच ऑस्कर पुरस्कार सोहळ्याला हजेरी लावली होती.ऑस्करमध्ये या छोट्याशा सनी पावरच्या हजेरीने त्याचे देशभारता खूप कौतुक झाले.आता रसिकांचे प्रेम आणि आशिर्वाद घेवून तो पुन्हा मुंबईत परतला आहे. विमानतळावर तो येताच त्याच्या स्वागतासाठी त्याच्या कुटूंबियांसह अनेक मित्रमंडळी उपस्थित होते. त्याच्या स्वागतासाठी मीडिया देखील आतुर झाला होता. आपण ऑस्कर पुरस्कार सोहळा एन्जॉय केला असल्याची प्रतिक्रिया यावेळी सनी पवारने दिली आहे. यावेळी आपल्या मुलाविषयी बोलताना सनीची आई वसु पवार यानाही गहिवरून आले होते. माझा आनंद शब्दातही व्यक्त करणे शक्य नाही. इतका आनंद मला झाला आहे. आज सनी पवारला सगळे ओळखतायेत.त्याला अनेक आशिर्वाद मिळतात हे पाहुन खूप खूप आनंद झाल्याचे सनीच्या आईने प्रतिक्रीया दिली आहे. 

या सिनेमाचे दिग्दर्शन ग्रॅथ डॅव्हिस यांनी केले असून सरू ब्रिले यांच्या खऱ्या आयुष्यावर या सिनेमाची कथा बेतलेली आहे.गुगल मॅपच्या मदतीने नायक आपल्या कुटुंबांचा कशाप्रकारे शोध घेतो हे या सिनेमात दाखवण्यात आले आहे. या सिनेमात सरूच्या लहानपणीची भूमिका सनी पवार या बालकलाकाराने साकारली आहे. या चित्रपटाचे चित्रीकरण सुरू झाले त्यावेळी केवळ सनी पाच वर्षांचा होता. त्यावेळी या चित्रपटातल्या भावना त्याला कळत नव्हत्या. पण आता या भावना चांगल्याप्रकारे तो समजून घेऊ शकतो असे तो सांगतो.सरू या भूमिकेसाठी दिग्दर्शक ग्रॅथ डॅव्हिस एका मुलाच्या शोधात होते. त्यांनी अनेक शाळांमधून दोन हजारांपेक्षाही अधिक मुलांचे ऑडिशन घेतले होते. पण या ऑडिशनमधून त्यांना कोणीच मुलगा ही भूमिका साकारण्यासाठी योग्य वाटत नव्हता. पण सनीला पाहाताच क्षणी त्यांनी त्याची या भूमिकेसाठी निवड केली. सनीचे ऑडिशन घेत असताना मी हा चित्रपटच पाहात होतो असे मला वाटत होते असे या चित्रपटाच्या दिग्दर्शकाने एका मुलाखतीत सांगितले आहे. 

Web Title: Sunny Pawar returned to Muni, to arrive at the airport

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.