See Pics Oscars 2017: हटके ड्रेसिंग स्टाइलने लावला सोहळ्याला चारचाँद

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2017 13:53 IST2017-02-27T06:15:59+5:302017-02-27T13:53:35+5:30

मानाचा आणि प्रतिष्ठेचा पुरस्कार सोहळा म्हणजे ऑस्करचा सोहळा. या रंगतदार सोहळ्याला उपस्थिती लावणे, या मानाच्या पुरस्कारावर आपलं ही नाव ...

See Pics Oscars 2017: Characted with a different dressing style | See Pics Oscars 2017: हटके ड्रेसिंग स्टाइलने लावला सोहळ्याला चारचाँद

See Pics Oscars 2017: हटके ड्रेसिंग स्टाइलने लावला सोहळ्याला चारचाँद

नाचा आणि प्रतिष्ठेचा पुरस्कार सोहळा म्हणजे ऑस्करचा सोहळा. या रंगतदार सोहळ्याला उपस्थिती लावणे, या मानाच्या पुरस्कारावर आपलं ही नाव कोरलं जावं अशी प्रत्येक कलाकाराची इच्छा असते. जगभरातल्या सिनेप्रेमींच्या नजरा या पुरस्कार सोहळ्याकडे असतात. त्यामुळे या ऑस्कर पुरस्कार सोहळ्याला हजेरी लावताना आपल्या स्टाईल, लूकवर सेलिब्रिटी बरीच मेहनत घेत असतात. ऑस्करच्या रेड कार्पेटवर हॉलीवुडच नाही तर जगभरातील माध्यमांच्या नजरा असतात. या सेलिब्रिटींची स्टाईल आपल्या कॅमे-याच्या लेन्समध्ये कैद करण्यासाठी माध्यम प्रतिनिधींची धडपड असते. दरवर्षीप्रमाणे यंदाच्या पुरस्कार सोहळ्यातही ऑस्करच्या रेड कार्पेटवर ता-यांचा जलवा पाहायला मिळाला. जणू अवघं तारांगण ऑस्करच्या रेड कार्पेटवर अवतरलं होतं. ऑस्करच्या रेड कार्पेटवर ग्लॅमरस ब्युटीचाच बोलबाला दिसून आला. नेहमीप्रमाणे यंदाही ब्यूटी विथ ब्रेनचीच प्रचिती रेड कार्पेटवर अनुभवयाला मिळाली.
 

इमा स्टोन



इमा स्टोन जेव्हा रेडकार्पेटवर अवतली तेव्हा तिच्या चार्मिग लुकमुळे मीडियाचे कॅमेरे तिची एक से बढकर एक पोज कॅमे-यात कैद करत होते. यावेळी तिने सोनेरी रंगाचा वनपीस घातला होता. त्यावर बारीक नक्षीकामही करण्यात आलं होतं. त्यामुळे इमाचं सौंदर्य आणखी खुलून गेलं होतं. त्यातच ड्रेसला मॅचिंग असणारे कानातले घालत सिंपल एंड सोबर अशी हेअरस्टाइल इमाने केली होती.


चार्ली थेरॉनने



चार्ली थेरॉनने रेड कार्पेटवर ड्रेसिंग स्टाइलने नाहीतर इयररिंग्समुळे सा-यांच्या नजरा आपल्याकडे आकर्षित केल्या. डायमंड इअररिंगमुळे तिचा लूक अधिक आकर्षक दिसत होता. यावेळी या एक्सेसरिज व्यतिरिक्त प्लिटेड मेटॅलिक गाऊन परिधान केला होता. केसांना समोर पफ काढत पोनी असलेली हेअरस्टाइल तिने कॅरी केली होती. स्टोनचे लांब इअरिंग तिच्या ड्रेसिंगवर अगदी उठून दिसत असल्यामुळे सोशल मीडियावर ड्रेसिंगपेक्षा इअररिंगमुळेच रसिकांना तिचा लूक पसंत पडल्याचे पाहायला मिळालं.


कार्ली क्लोस



कार्ली क्लोसचा रेड कार्पेटवरील लूक रसिकांच्या काळजाला भिडणार होता. व्हाइट रंगाचा गाऊन परिधान करत तिने रेड कार्पेटवर एंट्री मारली. यावेळी ती खूप स्टनिंग दिसत होती. क्लोसने डायमंड असलेला चोकर घातला होता. यामुळे तिचा हा हटके लूक विशेष लक्षवेधी ठरला.


इमा रॉबर्ट्स



अभिनेत्री इमा रॉबर्टंसची फॅशन स्टाईलही काहीशी हटके होती. सोहळ्याच्या रेड ड्रेस ग्रीन कार्पेट या संकल्पनेला पाठिंबा देत इमाने परिधान केलेला ड्रेस विशेष लक्षवेधी ठरला. 2005च्या कलेक्शनमधील अरमानी ड्रेस, टू टियर स्कर्ट, ब्लॅक बॉडीस यांत इमाच्या सौंदर्यात आणखी भर पडली होती.
 
हेली स्टेनफिल्ड


 

हेली स्टॅनफिल्ड हिने ऑस्कर पुरस्कार सोहळ्यासाठी राल्फ रुसी गाऊन परिधान केला होता. ग्रे सिल्क  ऑरर्गनझा, त्यावर थ्री डी फुलांची सुंदर नक्षी आणि क्रिस्टल यामुळे हेली स्टेनफिल्डचा अवतार तितकाच आकर्षक दिसत होता. 
 

Web Title: See Pics Oscars 2017: Characted with a different dressing style

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.