'या' सुपरस्टारला जपानमध्ये प्रवेश नाही, अंमली पदार्थांच्या व्यसनानं उद्धवस्त केलं आयुष्य

By ऑनलाइन लोकमत | Published: April 7, 2024 06:46 PM2024-04-07T18:46:22+5:302024-04-07T18:53:52+5:30

शेष म्हणजे नुकतेच या अभिनेत्याचा ऑस्कर पुरस्काने गौरव झाला आहे. 

Robert Downey Jr.’s Time Promoting Iron Man Went so Awry that He is Permanently Banned from Japan | 'या' सुपरस्टारला जपानमध्ये प्रवेश नाही, अंमली पदार्थांच्या व्यसनानं उद्धवस्त केलं आयुष्य

'या' सुपरस्टारला जपानमध्ये प्रवेश नाही, अंमली पदार्थांच्या व्यसनानं उद्धवस्त केलं आयुष्य

फिल्म इंडस्ट्रीमध्ये असे अनेक अभिनेते आहेत, ज्यांनी प्रसिद्धी, पैसा भरपूर कमावला.  दमदार अभिनयाच्या जोरावर प्रतिष्ठित पुरस्कार आपल्या नावे केले. पण, त्यांना खाजगी आयुष्यात मोठ्या वादळांचा सामना करावा लागला. असाच एक अभिनेता आहे, ज्याचं चाहते तर जगभरात आहेत. जगातील सर्वाधिक मानधन घेणारा अभिनेता अशी त्याची ख्याती आहे. पण, त्यानं आपल्या वैयक्तिक आयुष्यात अनेक चढउतार पाहिले आहेत. वैयक्तिक आयुष्यामुळे काही काळ त्याचं करिअरही धोक्यात आलं होतं. विशेष म्हणजे नुकतेच या अभिनेत्याचा ऑस्कर पुरस्काने गौरव झाला आहे. 

सुप्रिसद्ध अशा अभिनेत्यानं अगदी लहान वयातच ड्रग्ज घेण्यास सुरुवात केली होती. 1996 मध्ये त्याला अति नशा केल्याबद्दल तुरुंगवास भोगावा लागला होता. पण तुरुंगातील त्याची चांगली वागणूक लक्षात घेता शिक्षा कमी करण्यात आली होती. एवढेच नाही तर त्याच्या जपानमध्ये प्रवेशावरही बंदी घालण्यात आली आहे. हा अभिनेता दुसरा-तिसरा कोण नाही तर हॉलिवूड अभिनेता रॉबर्ट डाउनी ज्युनियर आहे. रॉबर्टला 'आयर्नमॅन' म्हणून ओळखलं जातं. 

 रॉबर्ट डाउनी ज्युनियरने 1970 साली 'पाउंड' या चित्रपटातून आपल्या करिअरची सुरुवात केली होती. आपल्या व्यावसायिक आयुष्यात सातत्याने यश मिळवणाऱ्या सर्वांच्या आवडत्या 'आयर्नमॅन'ला जपान या देशाने बंदी घातली आहे.  रॉबर्ट डाउनी ज्युनियर त्याच्या 'आयर्नमॅन' चित्रपटाच्या प्रमोशनसाठी जात असताना जपानी अधिकाऱ्यांनी त्याला विमानतळावर थांबवलं होतं. 

जेव्हा अधिकाऱ्यांनी त्याचा पासपोर्ट आणि जुने रेकॉर्ड तपासले तेव्हा त्यांना कळले की अभिनेत्याचे गुन्हेगारी रेकॉर्ड आहेत. सिनेमाच्या प्रमोशननंतर तो कधीही जपानला परतणार नाही या अटीवरच त्याला जपानी अधिकाऱ्यांनी सोडलं. त्यानंतर तो पुन्हा कधीच जपानाला गेला नाही. अभिनेत्यानं आपल्या संपूर्ण कारकिर्दीत अनेक मोठे हॉलिवूड चित्रपट केले आहेत.  तो 'आयर्नमॅन' म्हणून घराघरात प्रसिद्ध आहे. तर नुकतेच  2024 मध्ये रॉबर्टला ऑस्कर पुरस्कार मिळाला. ख्रिस्तोफर नोलनच्या 'ओपेनहायमर' या चित्रपटातल्या सहायक भूमिकेसाठी त्याला हा पुरस्कार मिळाला आहे. 

Web Title: Robert Downey Jr.’s Time Promoting Iron Man Went so Awry that He is Permanently Banned from Japan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.