रॅपर निकी मिनाजने तोडल्या बोल्डनेसच्या सर्व मर्यादा
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2017 21:17 IST2017-03-05T15:47:11+5:302017-03-05T21:17:11+5:30
रॅपर निकी मिनाजने पॅरिस फॅशन वीकमध्ये हैदर एकरमॅन वीमेन्सवीयर फॉल / विंटर २०१७ / १८ मध्ये अतिशय उत्तेजक कपडे ...

रॅपर निकी मिनाजने तोडल्या बोल्डनेसच्या सर्व मर्यादा
र पर निकी मिनाजने पॅरिस फॅशन वीकमध्ये हैदर एकरमॅन वीमेन्सवीयर फॉल / विंटर २०१७ / १८ मध्ये अतिशय उत्तेजक कपडे परिधान केले होते. फॅशन शो दरम्यान ती पहिल्याच रांगेत बसलेली होती. यावेळी तिने परिधान केलेले कपडे खूपच तोकडे होते, त्यामुळे उपस्थितांच्या नजरा तिच्यावर खिळल्या होत्या.
ईआॅनलाइन डॉट कॉम या वेबसाइटने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या शनिवारी या फॅशन शोचे आयोजन करण्यात आले होते. तिने परिधान केलेल्या कपड्यांमधून तिच्या छातीचा बराचसा भाग दिसत होता. त्याचबरोबर तिचा फिटेड जॅकेट टॉपमधून ती आणखीनच बोल्ड दिसत होती. १९९९ मध्ये एमटीव्ही व्हिडिओ म्युझिक अवॉर्डस दरम्यान रॅपर लिल किमनेही अशाच प्रकारचा ड्रेस परिधान करून सोहळ्यात आग लावली होती. आता निकीनेही अशाच प्रकारचा ड्रेस परिधान करून बोल्डनेसच्या सर्व मर्यादा पार केल्या आहेत. विशेष म्हणजे या दोघींमध्ये गेल्या काही वर्षांपासून जबरदस्त कोल्डवॉर सुरू आहे.
दरम्यान, निकीच्या या ड्रेसमुळे ती चांगलीच चर्चेत आली असून, ड्रेसमधील काही फोटोज् तिने इन्स्टाग्रामवरही शेअर केले आहेत. तिचा हा ड्रेस खूपच विचित्र दिसत असला तरी, ती याच ड्रेसमुळे चर्चेत आली आहे. आता रॅपर लिल किम निकीच्या या ड्रेसवर कशाप्रकारची प्रतिक्रिया देणार हे बघणे मात्र खरोखरच मजेशीर ठरेल.