‘बेवॉच’च्या प्रमोशनसाठी प्रियंका चोपडा दहा दिवस येणार भारतात!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2017 13:52 IST2017-04-16T08:22:56+5:302017-04-16T13:52:56+5:30

बॉलिवूड अन् आता हॉलिवूडमध्येही आपला लौकिक निर्माण करणारी अभिनेत्री प्रियंका चोपडा सध्या तिच्या आगामी ‘बेवॉच’ या पहिल्या हॉलिवूडपटाच्या प्रतीक्षेत ...

Priyanka Chopra to come for ten days in India for promotion of Bevoch! | ‘बेवॉच’च्या प्रमोशनसाठी प्रियंका चोपडा दहा दिवस येणार भारतात!

‘बेवॉच’च्या प्रमोशनसाठी प्रियंका चोपडा दहा दिवस येणार भारतात!

लिवूड अन् आता हॉलिवूडमध्येही आपला लौकिक निर्माण करणारी अभिनेत्री प्रियंका चोपडा सध्या तिच्या आगामी ‘बेवॉच’ या पहिल्या हॉलिवूडपटाच्या प्रतीक्षेत आहे. सध्या प्रियंका तिच्या अमेरिकी टीव्ही सिरीज ‘क्वांटिको’च्या दुसºया सिजनच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. मात्र अशातही ती ‘बेवॉच’ रिलीजच्या दहा दिवस अगोदर भारतात येणार आहे. सूत्रानुसार प्रियंकाने ‘क्वांटिको’ टीमकडून भारतात येण्यासाठी खास सुट्या काढल्या असून, यादरम्यान ती तिच्या काही बॉलिवूड प्रोजेक्ट्सवर चर्चा करणार आहे. त्याचबरोबर ‘बेवॉच’चे प्रमोशनही करणार आहे. 

प्रियंकाचा ‘बेवॉच’ हा चित्रपट पुढच्या महिन्यात रिलीज होणार आहे. चित्रपटात ती ‘व्हिक्टोरिया लीड्स’ या नकारात्मक भूमिकेत बघावयास मिळणार आहे. तिच्यासोबत ड्वेन जॉन्सन मुख्य भूमिकेत आहे. सध्या बेवॉचची संपूर्ण टीम चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त असून, भारतातील प्रमोशनची जबाबदारी प्रियंकाच्या खाद्यांवर आहे. त्यामुळेच ती भारतात येणार असल्याचे आता जवळपास स्पष्ट झाले आहे. 



गेल्यावर्षी जेव्हा प्रियंका भारतात आली होती; तेव्हा तिने स्पष्ट केले होते की, ती दोन बॉलिवूड प्रोजेक्टवर काम करणार आहे. मात्र अद्यापपर्यंत याविषयीची कुठल्याही प्रकारची अधिकृत घोषणा केली गेली नसल्याने, तिच्या बॉलिवूड चित्रपटांबाबत सस्पेन्स निर्माण झाला आहे. प्रियंका प्रकाश झा यांच्या ‘जय गंगाजल’ या चित्रपटात अखेरीस बघावयास मिळाली होती. 

दरम्यान, प्रियंकाच्या पर्पल पेबल प्रॉडक्शन अंतर्गत बनविण्यात आलेल्या ‘व्हेंटिलेटर’ या चित्रपटास तीन राष्टÑीय पुरस्कार मिळाल्याने ती सध्या खुश आहे. प्रादेशिक चित्रपट आज सर्वोच्च पुरस्कारांचे मानकरी ठरत असल्याने आनंद होत असल्याची प्रतिक्रिया प्रियंकाने व्यक्त केली होती. 

Web Title: Priyanka Chopra to come for ten days in India for promotion of Bevoch!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.