Photo Viral : जस्टिन बीबरचा हा फोटो बघाल तर तुम्हाला हसू आवरणे मुश्किल होईल!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2017 18:41 IST2017-02-26T13:11:31+5:302017-02-26T18:41:31+5:30

हॉलिवूडचा प्रसिद्ध पॉप सिंगर जस्टिन बीबर नेहमीच या ना त्या कारणाने चर्चेत असतो. कधी त्याच्या गर्लफ्रेंडमुळे, तर कधी त्याच्या ...

Photo Viral: If Justin Bieber sees this photo, you will find it difficult to smile! | Photo Viral : जस्टिन बीबरचा हा फोटो बघाल तर तुम्हाला हसू आवरणे मुश्किल होईल!

Photo Viral : जस्टिन बीबरचा हा फोटो बघाल तर तुम्हाला हसू आवरणे मुश्किल होईल!

लिवूडचा प्रसिद्ध पॉप सिंगर जस्टिन बीबर नेहमीच या ना त्या कारणाने चर्चेत असतो. कधी त्याच्या गर्लफ्रेंडमुळे, तर कधी त्याच्या रागीट स्वभावामुळे तो लाइमलाइटमध्ये असतो. यावेळेस मात्र तो यातील एकाही गोष्टीमुळे चर्चेत आला नसून, भलत्याच कारणाने चर्चेत आला आहे. विशेष म्हणजे त्याच्या या चर्चेतला एक फोटो व्हायरल झाला असून, हा फोटो बघून त्याच्या फॅन्सला अक्षरश: हसू येत आहे. बीबरने असे काय केले असावे, ज्यामुळे तो हास्यास कारणीभूत ठरत आहे? तर मग खालील वृत्त वाचा...



त्याचे झाले असे की, जस्टिनचा एक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये जस्टिन चालताना दिसत असून, त्याने पॅण्टमध्येच टॉयलेट केले की काय असे दिसत आहे. त्याच्या पॅण्टचा नेमका तोच भाग ओला दिसत असल्याने जस्टिनने पॅण्टमध्ये सू-सू तर केली नसावी ना? असे दिसत असल्याने फोटो बघणाºयांना हसू आवरणे मुश्किल होत आहे.  

जेव्हा ही बाब जस्टिनच्या लक्षात आली तेव्हा त्याने ट्विट करून यासर्व प्रकरणाचा खुलासा केला. ट्विटमध्ये त्याने लिहले की, ‘कोणीतरी मला फुलांचा एक गुच्छ दिला होता. त्यावेळेस मी ड्राइव्ह करत होतो. जसा मी टर्न घेतला तसे त्यातील पाणी माझ्या पॅण्टच्या त्या भागावर पडले. जर हे बघून लोकांना हसू येत असेल तर माझ्यावर त्याचा काहीही परिणाम होणार नाही. यावेळी जस्टिनने एक दुसरा फोटो शेअर केला, त्या फोटोखाली लिहले की, जोपर्यंत तुम्ही पॅण्टमध्ये टॉयलेट करणार नाही, तोपर्यंत तुम्हाला ‘कुल’ म्हणून ओळखले जाणार नाही. 



आता जस्टिनने केलेला हा खुलासा खरा की खोटा हे सांगणे जरी मुश्किल असले तरी, त्याच्या या फोटोमुळे नेटिझन्सचे चांगले मनोरंजन होत आहे हे मात्र नक्की! असो जस्टिनबद्दल बोलायचे झाल्यास गेल्या काही दिवसांपासून त्याच्याविषयी भारतात अधिक चर्चा रंगत आहे. कारण लवकरच तो भारतात येणार असून, मुंबईच्या डी. वाय. पाटील मैदानात १० मे रोजी त्याच्या लाइव्ह कॉन्सर्टचे आयोजन केले आहे. 

pic.twitter.com/pUGWM6HA2X— Justin Bieber (@justinbieber) February 24, 2017 ">

}}}}

Web Title: Photo Viral: If Justin Bieber sees this photo, you will find it difficult to smile!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.