असांजेसोबतच्या रोमान्सच्या अफवांचा आनंद घेतेय पामेला एंडरसन

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2017 22:08 IST2017-03-11T16:38:13+5:302017-03-11T22:08:13+5:30

गेल्या काही दिवसांपासून प्रसिद्ध अभिनेत्री पामेला एंडरसन आणि विकीलिक्सचे संस्थापक जुलियन असांजे यांच्यातील रोमान्सच्या जोरदार अफवा पसरविल्या जात आहेत. ...

Pamela Anderson enjoys romance rumors with Assange | असांजेसोबतच्या रोमान्सच्या अफवांचा आनंद घेतेय पामेला एंडरसन

असांजेसोबतच्या रोमान्सच्या अफवांचा आनंद घेतेय पामेला एंडरसन

ल्या काही दिवसांपासून प्रसिद्ध अभिनेत्री पामेला एंडरसन आणि विकीलिक्सचे संस्थापक जुलियन असांजे यांच्यातील रोमान्सच्या जोरदार अफवा पसरविल्या जात आहेत. परंतु या अफवांमुळे पामेला खुश असल्याचे नुकतेच तिने स्पष्ट केले आहे. 



फिमेल फर्स्ट या वेबसाइटने दिलेल्या माहितीनुसार ४९ वर्षीय अभिनेत्री पामेला लंडन येथील इक्वाडोर दूतावासात बºयाचदा बघावयास मिळाली. त्यामुळे सध्या या दोघांमध्ये रोमान्स तर सुरू नाही ना? अशा चर्चा रंगल्या होत्या. त्याचबरोबर दोघे नात्यात असल्याच्याही अफवा पसरविल्या गेल्या. मात्र या सर्व अफवांचे पामेलाने खंडन करताना म्हटले की, मी या अफवांमुळे खुश आहे. 

पामेला म्हणाली की, जुलियन यांना मी विविएने वेस्टवुडच्या माध्यमातून भेटली होती. मला दूतावासात जाण्यास एक तारीखही निश्चित करण्यात आली होती. मात्र मी चुकीच्या दिवशी तिथे पोहचली होती. अशात मला जुलियन यांनी मदत केल्याने माझी पुढे होणारी अडचण कमी झाली. तेव्हापासून मी जुलियनच्या क्लोज आली. माझे एक्स पती आणि एक्स बॉयफ्रेंडच्या तुलनेत मला जुलियनशी बोलायला आवडते. 



मात्र याचा अर्थ आम्ही दोघांनी रोमॅण्टिक व्हावे, असा होत नाही. कारण आम्हाला एक ताकद म्हणून पुढे यायचे आहे. आम्ही दोघेही या अफवांचा आनंद घेत असल्याचेही तिने सांगितले. त्याचबरोबर पामेलाने असेही म्हटले की, जर मला जागतिक स्तरावर एखादे नेतृत्व निवडायचे असेल तर मी निश्चितच जुलियन असांजे यांना समर्थन देईल. पामेलाचे असांजेबाबतचे गौरवोद्गार बरेच काही स्पष्ट करणारे आहेत. त्यामुळे सध्या तरी ते कुठल्याही नात्यात नसल्याचेच दिसून येत आहे. 

Web Title: Pamela Anderson enjoys romance rumors with Assange

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.