OSCARS 2017: प्रियांका चोप्राचा रेड कार्पेट लूक; बघा कशी दिसते आपली ‘देसी गर्ल’

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2017 10:04 IST2017-02-27T04:26:36+5:302017-02-27T10:04:54+5:30

८९ वे अकॅडमी अवॉर्ड्स अर्थातच आॅस्कर पुरस्कार सोहळा अमेरिकेतील लॉस एंजिलिस शहरातील डॉल्बी थिएटरमध्ये सुरू दिमाखात पार पडला. फिल्म ...

OSCARS 2017: Priyanka Chopra's Red Carpet Look; See how your 'Desi Girl' | OSCARS 2017: प्रियांका चोप्राचा रेड कार्पेट लूक; बघा कशी दिसते आपली ‘देसी गर्ल’

OSCARS 2017: प्रियांका चोप्राचा रेड कार्पेट लूक; बघा कशी दिसते आपली ‘देसी गर्ल’

वे अकॅडमी अवॉर्ड्स अर्थातच आॅस्कर पुरस्कार सोहळा अमेरिकेतील लॉस एंजिलिस शहरातील डॉल्बी थिएटरमध्ये सुरू दिमाखात पार पडला. फिल्म इंडस्ट्रीमधील सर्वात ग्लॅमरस आणि बहुप्रतीक्षित असा हा सोहळा असतो. आॅस्कर रेड कार्पेटवर चालण्याचे स्वप्न उराशी बाळगून अनेक कलाकार या कार्यक्रमाला हजेरी लावतात.

आॅस्कर रेड कार्पेटवर दिसणे म्हणजे स्टारडमला उभारी मिळण्यासारखे असल्यामुळे अनेक सिने कलाकार खास या इव्हेंटसाठी वर्षभर तयारी करीत असतात. यंदाच्या सोहळ्या भारताकडून प्रियांका चोप्राने सौंदर्याचे चार चांद लावले. ‘रेड कार्पेट क्वीनी’ म्हणून आता ओखळल्या जाणाऱ्या प्रियांकाच्या ड्रेसकडे सर्वांचेच लक्ष लागलेले होते.

भारताची ‘देसी गर्ल’ आणि आता हॉलीवूडला आपल्या प्रेमात पाडणाऱ्या प्रियांकाने मोठ्या दिमाखात रेड कार्पेटवर एन्ट्री केली. यावेळी तिने परिधान केलेला राल्फ अँड रुसो गाऊन सर्वांच्याच आवडीचा ठरला. कॉलम गाऊन प्रकारातील या अत्यंत सुंदर ड्रेसमध्ये ती उठून दिसत होती.

Priyanka

Priyanka

Priyanka

Priyanka

Priyanka

Priyanka

या गाऊनमध्ये विशेष ठरले ते आयव्होरी व्हाईट क्रिएशन. परफेक्ट लूक मिळवण्यासाठी तिने ड्रॉप इअर रिंग्स आणि चंकी ब्रेसलेट घातलेले होते जे या ड्रेसवर एकदम शोभून दिसत होते. गेल्या वर्षी तिने झुहैर मुराद या डिझायनरने तयार केलेल्या ड्रेसमध्ये आॅस्कर सोहळ्याला हजेरी लावली होती.

मात्र यंदाचा तिचा रेड कार्पेट लूक आतापर्यंतचा ‘बेस्ट’ आहे अशी फॅशन जगतातून प्रतिक्रिया उमटत आहे. तुम्हाला प्रियांकाचा हा लूक कसा वाटला? तिच्या स्टारडम आणि तुमच्या अपेक्षेनुसार तिचा हा ड्रेस होता का? आम्हाला खाली कमेंट बॉक्समध्ये लिहून कळवा.

Web Title: OSCARS 2017: Priyanka Chopra's Red Carpet Look; See how your 'Desi Girl'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.