OSCARS 2017 : ‘आॅस्कर’ सोहळ्यात प्रियंका चोपडाबरोबरच दीपिका पादुकोनही होणार सहभागी?
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2017 21:14 IST2017-02-26T15:41:48+5:302017-02-26T21:14:44+5:30
अभिनेत्री दीपिका पादुकोण ८९व्या आॅस्कर अवॉर्ड सोहळ्यात सहभागी होणार की नाही, याविषयी चर्चा रंगली असताना अचानकच ती आॅस्करच्या प्री-पार्टीत ...

OSCARS 2017 : ‘आॅस्कर’ सोहळ्यात प्रियंका चोपडाबरोबरच दीपिका पादुकोनही होणार सहभागी?
अ िनेत्री दीपिका पादुकोण ८९व्या आॅस्कर अवॉर्ड सोहळ्यात सहभागी होणार की नाही, याविषयी चर्चा रंगली असताना अचानकच ती आॅस्करच्या प्री-पार्टीत सहभागी झाल्याचे समोर आले होते. आता आलेल्या माहितीनुसार या पार्टीत तिच्यासोबत प्रियंका चोपडादेखील सहभागी होती. दोघींचा अकादमी अवॉर्डमध्येच सामना होणार होता, मात्र काही कारणास्तव तो होऊ शकला नाही, परंतु आॅस्करच्या प्री-पार्टीत मात्र दोघी एकत्र बघावयास मिळाल्या आहेत. त्यामुळे आता दोघीही आॅस्करच्या मुख्य समारंभात सहभागी होतील अशी चर्चा रंगली आहे.
![]()
दीपिकाचा नुकताच ‘ट्रीपल एक्स : द रिटर्न आॅफ जेंडर केज’ हा सिनेमा रिलीज झाला आहे. या सिनेमाने बॉक्स आॅफिससह वर्ल्डवाइज जबरदस्त कलेक्शन केले आहे. त्यामुळे सध्या दीपिकाचे हॉलिवूडमध्ये चांगलेच वजनही वाढले आहे. तर प्रियंकाविषयी बोलायचे झाल्यास दीपिकाच्या अगोदर ती हॉलिवूडमध्ये पोहचली आहे. अमेरिकन टीव्ही मालिका ‘क्वांटिको’मधून तिने थेट हॉलिवूडचे दरवाजे ठोठावले आहे. द रॉकसोबत ती ‘बेवॉच’ या सिनेमात डेब्यू करणार असून, लवकरच हा सिनेमा रिलीज होणार आहे. सिनेमात प्रियंका निगेटिव्ह भूमिकेत बघावयास मिळणार आहे.
ALSO READ :OSCAR 2017: दीपिका पदुकोणचा खोटारडेपणा उघडकीस; हा बघा पुरावा...
थोडक्यात हॉलिवूडमध्ये या दोघीही स्थिरावल्याने त्यांचे आॅस्कर समारंभात सहभागी होणे जवळपास निश्चित मानले जात होते. प्रियंकाने तर गेल्यावर्षीच्याच आॅस्करमध्ये हजेरी लावली असल्याने तिची ही दुसºयादा आॅस्कर वारी ठरणार आहे. तसे प्रियंकाने गेल्या शुक्रवारीच इन्स्टाग्रामवर प्रसिद्ध ब्रिटिश गायक मिक जॅगर यांच्यासोबतचा एका फोटो शेअर करीत आॅस्करमध्ये सहभागी होणार असल्याचे स्पष्ट केले होते.
![]()
मात्र दीपिकाच्या आॅस्कर अवॉर्ड सोहळ्यातील सहभागाविषयी साशंकता व्यक्त केली जात होती. मात्र आॅस्करच्या प्री कॉकटेल पार्टीत ती प्रियंकासोबत टेबल शेअर करताना बघावयास मिळाली आहे. त्यामुळे बॉलिवूडची ही मस्तानी आता ८९ आॅस्करच्या मुख्य समारंभातही सहभागी होईल, हे आता निश्चित समजले जात आहे.