OSCARS 2017 : प्रेग्नंट असल्यामुळे नटाईली पोर्टमन राहणार अनुपस्थित !

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2017 19:36 IST2017-02-26T14:04:52+5:302017-02-26T19:36:06+5:30

८९वा आॅस्कर सोहळा अवघ्या काही तासांवर आलेला आहे. सिनेजगतातील सर्वात प्रतिष्ठितेचा पुरस्कार समजल्या जाणाऱ्या या अवॉर्ड शोमध्ये हॉलीवूडमधील अनेक ...

OSCARS 2017: Natalie Portman absent due to pregnancy! | OSCARS 2017 : प्रेग्नंट असल्यामुळे नटाईली पोर्टमन राहणार अनुपस्थित !

OSCARS 2017 : प्रेग्नंट असल्यामुळे नटाईली पोर्टमन राहणार अनुपस्थित !

वा आॅस्कर सोहळा अवघ्या काही तासांवर आलेला आहे. सिनेजगतातील सर्वात प्रतिष्ठितेचा पुरस्कार समजल्या जाणाऱ्या या अवॉर्ड शोमध्ये हॉलीवूडमधील अनेक दिग्गज आवर्जुन हजेरी लावतात. सर्वोत्कृष्ट अभिनेत्री म्हणून नामांकित असलेली नटाईली पोर्टमन मात्र आॅस्करला जाणार नाही.

तिच्या न जाण्यामागे कारणही तसे मोठे आहे. नटाईली गर्भवती असून अशा अवस्थेत ती सोहळ्याला हजर राहू शकणार नाही. ३५ वर्षीय नटाईली दुसऱ्यांदा आई होणार आहे. नामांकित असूनही अनेक अवॉर्ड्स सोहळ्यांत ती अनुपस्थित होती. त्यामुळे अकॅडमी अवॉर्ड्समधील तिच्या सहभागावर प्रश्नचिन्ह होते.

ALSO READ: ‘आॅस्कर’मध्ये कोणाला मिळाले नामांकन अन् कोण आहे रेसमध्ये; वाचा सविस्तर...

आॅस्करला जाणार नसल्याचे तिने अधिकृतपणे घोषित केले. ती म्हणाली, ‘मी लवकरच आई होणार असल्यामुळे आॅस्कर आणि इंडिपेंडंट स्पिरीट अवॉर्ड्सला हजर राहू शकणार नाही. मला नामांकन मिळाले यातच मी खूप खुश आहे. माझ्यासोबत नामांकित झालेल्या सर्वांना मी शुभेच्छा देते आणि हा सोहळा त्यांच्यासाठी कायमचा यादगार व्हावा अशी इच्छा व्यक्त करते.’

JAckie
जॅकी : नटाईली पोर्टमन

‘जॅकी’ या सिनेमातील भूमिकेसाठी नटाईली बेस्ट अ‍ॅक्ट्रेस या श्रेणीत नामांकित आहे. अमेरिकेचे पूर्व राष्ट्राध्यक्ष जे. एफ. केनडी यांची पत्नी जॅकलीन यांची भूमिका तिने साकारलेली आहे. विशेष म्हणजे पहिल्या मुलाच्या वेळी गर्भवती असतानादेखील तिने आॅस्कर पुरस्कार सोहळ्याला हजेरी लावली होती. परंतु यावेळी ती तसे करणार नाही.

ALSO READ: दीपिका पदुकोणचा खोटारडेपणा उघडकीस; हा बघा पुरावा...

अमेरिकेत रविवारी (२६ फेब्रुवारी) सायंकाळी होणाऱ्या या रंगारंग सोहळ्यात भारतीय सेलिब्रेटींपैकी दीपिका पदुकोण आणि प्रियांका चोप्रा रेड कार्पेटवर जलवा दाखवणार आहेत.महान संगीतकार मिक जॅगर यांच्यासोबत प्रियांका सोहळ्यात हजर होणार आहे. तसा तिने इन्स्टाग्रामवर फोटोदेखील शेअर केला.

तिकडे दीपिकाने आधी हजर राहणार नाही म्हणून सांगितले होते. मात्र, प्री-आॅस्कर कॉकटेल पार्टीत ती गेली होती. त्यामुळे तीदेखील मुख्य सोहळ्याला उपस्थित राहण्याची शक्यता आहे. ‘ट्रिपल एक्स : द रिटर्न आॅफ झेंडर केज’द्वारे तिने हॉलीवूडमध्ये पदार्पण केले आहे.

Web Title: OSCARS 2017: Natalie Portman absent due to pregnancy!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.