OSCARS 2017: आॅस्कर पुरस्कारांमध्ये गोंधळ; सोशल मीडिया जोक्सला आले उधाण!
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2017 11:50 IST2017-02-27T06:20:10+5:302017-02-27T11:50:10+5:30
यंदाचा आॅस्कर पुरस्कार सोहळा कायम स्मरणात राहिल. अहो, पण चांगल्या गोष्टीसाठी नाही तर एका अक्षम्य चुकीसाठी. सर्वोत्कृष्ट चित्रपटाचे नाव ...

OSCARS 2017: आॅस्कर पुरस्कारांमध्ये गोंधळ; सोशल मीडिया जोक्सला आले उधाण!
त्याचे झाले असे की, वॅरेन बेटी आणि फे डुनावे सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार देण्यासाठी स्टेजवर आले. विजेत्याचे नाव घोषित करताना त्यांनी बेस्ट फिल्म अवॉर्डसाठी ‘ला ला लँड’चे नाव घेतले. तब्बल १४ विभागांत नामांकने मिळवणाऱ्या ' ला ला लॅण्ड'ला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीसह सर्वोत्कृष्ट चित्रपटाचाही पुरस्कार मिळाल्याने चित्रपटाच्या टीमचा आनंद गगनात मावेनासा झाला. पुरस्कार घेण्यासाठी स्टेजवर आलेल्यांना शब्दच सुचत नव्हते.
मात्र अवघ्या काही क्षणांतच त्यांच्या या आनंदावर विरजण पडले. आयोजकांच्या चुकीमुळे ' ला ला लॅण्ड'ला सर्वोत्कृष्ट चित्रटाचा पुरस्कार घोषित झाला मात्र अवघ्या काही सेकंदात ही चूक सुधारण्यात आली आणि सर्वोत्कृष्ट चित्रपट म्हणून 'मूनलाईट'चे नाव घोषित करण्यात आले.
या गोंधळानंतर कुणाच्या डोळ्यात अश्रू तर कुणाच्या ओठांवर हसू.. असे चित्र दिसू लागले. ' कभी खुशी कभी गम'चा हा अनुभव आॅस्कर सोहळ्यातील उपस्थितांना आला. आॅस्कर इतिहासातील हा सर्वात आॅकवर्ड मोमेंट म्हणून कायम स्मरणात राहणार एवढे मात्र नक्की.
एवढ्या प्रतिष्ठेच्या कार्यक्रमात अशी चूक व्हावी असे कोणालाच वाटले नव्हते. विशेष म्हणजे हा संपूर्ण सोहळा २२५ देशांमध्ये लाईव्ह दाखवण्यात येत होता. त्यामुळे जगभरातील नेटिझन्सना तर ट्रोलिंगसाठी आयते कोलितच हातात मिळाले. या गोंधळामुळे सोशल मीडियावर मजेशीर जोक्स फिरत आहेत.
Warren Beatty's drink bill for the La La Land folks will be staggering.— Jeffrey Wright (@jfreewright) 27 February 2017
Emma Stone: "I was holding my Best Actress envelope the whole time. I don't know what story was told but ... wanted to tell you guys first"— Josh L. Dickey (@JLDlite) 27 February 2017
And the Academy Award for Best Picture goes too... pic.twitter.com/iS9jTutURd— Tom Knight (@TJ_Knight) 27 February 2017
Heads are gonna roll. You couldn't have a worse possible f-up if you tried. Team LLL still consoling each other in theater. pic.twitter.com/UUr6dlKF9S— Scott Feinberg (@ScottFeinberg) 27 February 2017
#Oscars shocker: Warren Beatty reads the wrong Best Picture winner, 'La La Land' didn't win — 'Moonlight' did. pic.twitter.com/iB6TLxyTn5— Hollywood Reporter (@THR) 27 February 2017
THIS EMOTIONAL ROLLERCOASTER IS NOT OK, BUT I'M HAPPY ABOUT THE RESULTS #Oscarspic.twitter.com/1P2dAlBWJH— Carolina J. Moreno (@CaritoJuliette) 27 February 2017
बरं केवळ प्रेझेंटरनेच नाही तर अकॅडमीने स्वत: अधिकृत अकाउंटवरून ट्विट करून ‘ला ला लँड’ जिंकल्याचे घोषित केले होते.
#LALALAND was also tweeted as the winner from @TheAcademy's account #Oscarspic.twitter.com/WNI7Pza1ZE— C. Molly Smith (@cmollysmith) 27 February 2017
I feel sorry for anyone having Price Waterhouse Coopers preparing their taxes— Dave Itzkoff (@ditzkoff) 27 February 2017
या संपूर्ण घडामोडीवर सर्वोत्तम कोटी केली ती अशा ट्विस्ट एंडिंगसाठी प्रसिद्ध असणाऱ्या दिग्दर्शक मनोज एम. नाईट श्यामलनने. त्याने ट्विट केले की, शेवटच्या क्षणी नाव बदलण्याचा ट्विस्ट मीच लिहिला होता.
I wrote the ending of the academy awards 2017. @jimmykimmel we really got them!— M. Night Shyamalan (@MNightShyamalan) 27 February 2017
बरं या सगळ्यात काही वॅरेन बेटची चूक नाही. ते खरोखरंच योग्य त्या पाकीटाच्या शोधात होते हा पाहा व्हिडिओ...
Beatty wasn't bullshitting. He was desperately looking for another card. He got handed the wrong envelope. pic.twitter.com/Efu8sICf8Y— Hershal (@hershal) 27 February 2017
तत्पूर्वी अपेक्षेप्रमाणे म्युझिकल सेन्सेशन ‘ला ला लँड’ने संपूर्ण अवॉर्ड शोवर दबदबा कायम राखला.सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक, अभिनेत्री, पार्श्वसंगीत, गीत, छायांकन आणि प्रोडक्शन डिझाईन अशा एकूण सहा पुरस्कारांवर या चित्रपटाने नाव कोरले.
► ALSO READ ; ‘मूनलाईट’ ठरला सर्वोत्कृष्ट चित्रपट; ‘ला ला लँड’ने मारली ६ पुरस्कारांवर बाजीे
► ALSO READ ; विजेत्यांची संपूर्ण यादी