OSCARS 2017: जिमी किमेलचा मराठमोळ्या सनी पवारसोबत ‘लायन किंग’ मोमेंट
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2017 13:38 IST2017-02-27T08:08:51+5:302017-02-27T13:38:51+5:30
चुकीच्या बेस्ट फिल्मचे नाव घेण्यापासून ते प्रवाशांचे लग्न लावण्यापर्यंत अनेक गंमतीजंमती यंदाच्या ८९व्या आॅस्कर पुरस्कार सोहळ्यात घडल्या. त्याचबरोबरच कार्यक्रमाचा ...

OSCARS 2017: जिमी किमेलचा मराठमोळ्या सनी पवारसोबत ‘लायन किंग’ मोमेंट
ref="http://cnxmasti.lokmat.com/hollywood/hot-gossip/blunder-on-oscar-stage-with-the-names-of-best-film/18459">चुकीच्या बेस्ट फिल्मचे नाव घेण्यापासून ते प्रवाशांचे लग्न लावण्यापर्यंत अनेक गंमतीजंमती यंदाच्या ८९व्या आॅस्कर पुरस्कार सोहळ्यात घडल्या. त्याचबरोबरच कार्यक्रमाचा होस्ट प्रसिद्ध कॉमेडियन जिमी किमेलने मराठमोठ्या सनी पवारला हवेत उचलून ‘लायन किंग’ची आठवन करून देण्याचा प्रसंग काही वेगळाच होता.
‘लायन’ चित्रपटाला जरी आजच्या सोहळ्यात फारशी चमक दाखवता आली नसली तरी बालकलाकार सनी पवारने उपस्थितांचे मन जिंकून कसर भरून काढली. जिमी किमेल आणि त्याचा संवाद संपूर्ण अवॉर्ड शोचा ‘हायलाईट पॉर्इंट’ होता.
► ALSO READ: ‘मूनलाईट’ ठरला सर्वोत्कृष्ट चित्रपट; ‘ला ला लँड’ने मारली ६ पुरस्कारांवर बाजीे
जिमी बोलत बोलत सनी जेथे बसला होते तेथे गेला आणि त्याच्याशी ‘हॅकसॉ रिज’ सिनेमाच्या एडिटिंगविषयी बोलू लागला. जिमीला वाटले की, दहा वर्षांचा हा पोरगा काय उत्तर देणार? परंतु सनीने आपल्या बुद्धीमत्तेची चुणूक दाखवत जसे जमेल तसे उत्तर दिले.
त्याच्या अशा प्रतिभेला पाहून जिमीने त्याला हवेत उचलून ‘लायन किंग’ चित्रपटातील प्रसिद्ध सीनची आठवण करून दिली. तत्पूर्वी जिमीने संपूर्ण पाहुण्यांना हवेतून छोट्या छोट्या पॅराशूटद्वारे कँडी दिल्या होत्या. खास सनीसाठी त्याने पुन्हा तशाच प्रकारे कँडी खाली आणल्या.
आजच्या सोहळ्यात ‘मूनलाईट’ सर्वोत्कृष्ट चित्रपट ठरला तर सहा पुरस्कारांसह ‘ला ला लँड’ आघाडीवर राहिला. १४ नामांकनांपैकी त्याने दिग्दर्शन, अभिनेत्री, पार्श्वसंगीत, गीत, छायांकन आणि प्रोडक्शन डिझाईन या विभागांत विजय मिळवला. केसी अॅफ्लेक बेस्ट अॅक्टर तर एमा स्टोन बेस्ट अभिनेत्री म्हणून विजेती ठरली.
वर्णभेदाच्या आरोपाच्या पार्श्वभूमीवर यंदाचा आॅस्कार निराळा ठरला. व्हायोला डेव्हिस आणि महेरशाला अली या दोन कलाकारांना अनुक्रमे सर्वोत्कृष्ट सह-अभिनेत्री आणि सह-अभिनेता म्हणून सन्मानित करण्यात आले.
►ALSO READ: विजेत्यांची संपूर्ण यादी

#LionKing moment #Oscarspic.twitter.com/aWBA27hGzy— Phuong (@KStewlicious) 27 February 2017