OSCARS 2017 : सोहळ्याची तयारी अंतिम टप्प्यात ; पाहा रेड कार्पेट टाकतानाचा व्हिडिओ

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2017 20:38 IST2017-02-26T15:08:07+5:302017-02-26T20:38:07+5:30

आॅस्कर पुरस्कार सोहळ्याची तयारी अंतिम टप्प्यात पोहचली आहे. भारतीय वेळेनुसार सोमवारी पहाटे ५.३० वाजता मुख्य कार्यक्रमास सुरूवात होणार असून ‘बेस्ट पिक्चर’चा पुरस्कार कोण घेऊन जाणार याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.

OSCARS 2017: In the final stage of the preparations for the ceremony; See Red Carpets Video | OSCARS 2017 : सोहळ्याची तयारी अंतिम टप्प्यात ; पाहा रेड कार्पेट टाकतानाचा व्हिडिओ

OSCARS 2017 : सोहळ्याची तयारी अंतिम टप्प्यात ; पाहा रेड कार्पेट टाकतानाचा व्हिडिओ

स्कर पुरस्कार सोहळ्याची तयारी अंतिम टप्प्यात पोहचली आहे. भारतीय वेळेनुसार सोमवारी पहाटे ५.३० वाजता मुख्य कार्यक्रमास सुरूवात होणार असून ‘बेस्ट पिक्चर’चा पुरस्कार कोण घेऊन जाणार याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.

oscar preperations

सोहळ्यातील सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे रेड कार्पेट. या रेड कार्पेटवर हॉलीवूडमधील दिग्गज सिलेब्रेटी त्यांचे फॅशनेबल आणि स्टाईलिश ड्रेस दिमाखात दाखवत चालणार आहेत.

oscar preperations

त्यासाठी हॉलीवूड बुलेवार्डमध्ये एक स्पेशल स्ट्रक्चर बांधण्यात आले असून त्यावर सुमारे ९०० फूट (२७५) लांबीचे रेड कार्पेट टाकण्यात आले आहे.

oscar preperations

oscar preperations

गेल्या अनेक आठवड्यांपासून या सोहळ्याची तयारी सुरू असून रेड कार्पेट आणि त्याच्या आसपासचे स्ट्रक्चर बांधण्यात येत आहे.

oscar preperations

oscar preperations

डॉल्बी थिएटरमध्ये पार पडणाऱ्या या सोहळ्यात सजावट म्हणून लाईफ-साईज आॅस्कर स्टॅच्यु (बाहुल्या) ठेवण्यात आलेल्या आहेत.

oscar preperations

आता एवढे मोठे स्टार्स अवॉर्ड शोला येणार म्हटल्यावर सुरक्षेच्या दृष्टीकोनातून डॉल्बी थिएटरच्या आसपासचे रस्ते ट्रॅफिककरिता बंद करण्यात आले आहेत. अत्यंत कडक बंदोबस्तात संपूर्ण कार्यक्रम होणार आहे.

oscar preperations

रेड कार्पेट खराब होऊ नये म्हणून त्यावर गेले काही दिवस प्लॅस्टिक टाकण्यात आले होते. मात्र आता कार्यक्रमाला अवघ्या तासांचा कालावधी उरलेला असल्यामुळे प्लॅस्टिकचे आवरण गुंडाळण्यात आले.

oscar preperations

आॅस्कर सोहळ्याचे प्रक्षेपण एकूण २२५ देशांत होणार असून एकट्या अमेरिकेत तीस कोटींपेक्षा जास्त लोक हा कार्यक्रम लाईव्ह बघणार असल्याचा अंदाज आहे.

oscar preperations

अशाप्रकारच्या सजावटीचे सामान ३३०० हजार आसनक्षमतेच्या या डॉल्बी थिएटरमध्ये ठेवण्यात आलेले आहे. 

oscar preperations

लॉस एंजेलिस शहरात जरी सूर्यदर्शन होत असले तरी सायंकाळी रिमझिम पावसाची शक्यता आहे. त्यामुळे खबरदारी म्हणून रेड कार्पेटवर अच्छादन टाकण्यासाठी असे भव्य स्ट्रक्चर उभारण्यात आलेले आहे.



अकॅडमी अवॉर्ड्सचे हे ८९वे वर्ष असून प्रसिद्ध कॉमेडी शो होस्ट जिमी किमेल यंदाच्या सोहळ्याचा होस्ट आहे.

 

Web Title: OSCARS 2017: In the final stage of the preparations for the ceremony; See Red Carpets Video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.