OSCARS 2017: ‘मूनलाईट’ ठरला सर्वोत्कृष्ट चित्रपट; ‘ला ला लँड’ने मारली ६ पुरस्कारांवर बाजी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2017 13:39 IST2017-02-27T05:38:08+5:302017-02-27T13:39:24+5:30

वर्षभर ज्या सोहळ्याची आतूरतेने वाट पाहिले जाते तो आॅस्कर पुरस्कार सोहळा अखेर पार पडला. अपेक्षेप्रमाणे म्युझिकल सेन्सेशन ‘ला ला ...

OSCARS 2017: Best Film for 'Moonlight'; LA LA LAND 'has won 6 awards | OSCARS 2017: ‘मूनलाईट’ ठरला सर्वोत्कृष्ट चित्रपट; ‘ला ला लँड’ने मारली ६ पुरस्कारांवर बाजी

OSCARS 2017: ‘मूनलाईट’ ठरला सर्वोत्कृष्ट चित्रपट; ‘ला ला लँड’ने मारली ६ पुरस्कारांवर बाजी

्षभर ज्या सोहळ्याची आतूरतेने वाट पाहिले जाते तो आॅस्कर पुरस्कार सोहळा अखेर पार पडला. अपेक्षेप्रमाणे म्युझिकल सेन्सेशन ‘ला ला लँड’ने संपूर्ण अवॉर्ड शोवर दबदबा कायम राखला. मात्र सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा मान मिळवण्यापासून तो वंचित राहिला. ८९व्या आॅस्कर पुरस्कारांत तो मान मिळाला ‘मूनलाईट’ या अतिशय सुंदर चित्रपटाला. बेरी जेंकिन्स दिग्दर्शित या चित्रपटाने बेस्ट फिल्म आणि बेस्ट अ‍ॅडॅप्टेड स्क्रीनप्ले असे दोन पुरस्कार जिंकले.

टीम मूनलाईट
बेस्ट पिक्चर :टीम मूनलाईट

१४ नामांकनासह आघाडीवर असलेल्या ‘ला ला लँड’ने सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक, अभिनेत्री, पार्श्वसंगीत, गीत, छायांकन आणि प्रोडक्शन डिझाईन अशा एकूण सहा पुरस्कारांवर नाव कोरले. विशेष म्हणजे प्रेझेंटर वॅरेन बेटी यांनी बेस्ट फिल्मसाठी ‘ला ला लँड’ची घोषणा केली मात्र नंतर चुक लक्षात आल्यावर ‘मूनलाईट’चे नाव घेण्यात आले.

oscarsसर्वोत्कृष्ट अभिनेता : केसी अ‍ॅफ्लेक (मँचेस्टर बाय द सी)

emmaसर्वोत्कृष्ट अभिनेत्री : एमा स्टोन (ला ला लँड) 

oscar
सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक : डेमियन चॅझेल (ला ला लँड)

‘मँचेस्टर बाय द सी’ या चित्रपटानसाठी केसी अ‍ॅफ्लेक सर्वोत्कृष्ट अभिनेता ठरला. मध्यंतरी त्याच्यावर लैंगिक छळाचा आरोप करण्यात आला होता. त्यामुळे त्याच्या विजयावर शंका उपस्थित केली जात होती. मात्र, बेस्ट अ‍ॅक्टर पुरस्काराचा सुरूवातीपासूनच फेव्हरेट असलेला केसी अखेर विजयी ठरला. विशेष म्हणजे त्याच्या नावाची घोषणा होताच सह नामांकित डेन्झेल वॉशिंग्टनने अशी तिखट प्रतिक्रिया दिली.

 
सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीसाठी एमा स्टोनदेखील आधीपासूनच निश्चित मानली जात होती. ‘ला ला लँड’मधील तिच्या असाधारण अभिनयामुळे तिने एक प्रतिभावान अभिनेत्री असल्याचे दाखवून दिले. गेल्या वर्षीचा बेस्ट अ‍ॅक्टर लिओनार्दो डिकॅप्रिओने तिला पुरस्कार प्रदान केला. 

oscars
सर्वोत्कृष्ट सह अभिनेत्री : व्हायोला डेव्हिस (फेन्सेस)

Oscarसर्वोत्कृष्ट सह अभिनेता : महेरशाला अली (मूनलाईन)

गेल्या वर्षी वर्णभेदामुळे वादात सापडलेल्या आॅस्करने यावेळी मात्र व्हायोला डेव्हिस आणि महारशेला अली या अश्वेत कलाकारांना सर्वोत्कृष्ट सह-अभिनेत्री आणि सह-अभिनेत्यच्या पुरस्कारांनी नावाजून आपल्या धोरणात एक चांगला बदल आत्मसात केल्याचे दाखवून दिले.

तरुण दिग्दर्शक डेमियन चॅझेलचे नाव सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाच्या स्पर्धेत आघाडीवर होते. त्यामुळे अपेक्षेप्रमाणे त्याचा वियजसुद्धा निश्चित मानला जात होता. वयाच्या केवळ ३२ व्या वर्षी हा पुरस्कार जिंकून तो आॅस्कर मिळवणारा सर्वात तरुण दिग्दर्शक ठरला. पुरस्कार स्वीकारताना तो म्हणाला की, ‘हा चित्रपट प्रेमाविषयी होता. आणि मी स्वत:ला भाग्यवान समजतो की, हा चित्रपट बनवातना मी त्याच्या प्रेमात पडलो.’ यावेळी त्याने गर्लफ्रेंडचे देखील आभार मानले.

ALSO READ :  विजेत्यांची संपूर्ण यादी

Web Title: OSCARS 2017: Best Film for 'Moonlight'; LA LA LAND 'has won 6 awards

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.