आॅस्कर विजेता ‘द सेल्समॅन’ सिनेमा भारतात ३१ मार्च रोजी होणार रिलीज

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2017 20:04 IST2017-03-08T14:34:09+5:302017-03-08T20:04:09+5:30

इराणी निर्माता असगर फरहदी याचा ‘द सेल्समॅन’ हा सिनेमा भारतात ३१ मार्च रोजी रिलीज केला जाणार आहे. सिनेमात तरानेह ...

Oscar winner 'The Salesman' will be released in India on 31st March | आॅस्कर विजेता ‘द सेल्समॅन’ सिनेमा भारतात ३१ मार्च रोजी होणार रिलीज

आॅस्कर विजेता ‘द सेल्समॅन’ सिनेमा भारतात ३१ मार्च रोजी होणार रिलीज

ाणी निर्माता असगर फरहदी याचा ‘द सेल्समॅन’ हा सिनेमा भारतात ३१ मार्च रोजी रिलीज केला जाणार आहे. सिनेमात तरानेह अलिदुस्ती आणि शाहब हौसॅनी यांच्या मुख्य भूमिका आहेत. या सिनेमाने बेस्ट फॉरेन कॅटेगिरीत आॅस्कर पटकावले असून, जगभरात या सिनेमाची प्रेक्षकांना अक्षरश: आतुरता लागलेली आहे. 

‘द सेल्समॅन’ला भारतात रिलीज करण्यासाठी पुढाकार घेतलेल्या सुनील दोषीने आयएएनएसशी बोलताना म्हटले की, भारतात चांगले सिनेमे घेऊन येणे हा आमचा फोकस आहे. ‘द सेल्समॅन’सोबत आमची सुरुवात खूपच चांगली झाली आहे. पुढच्या काळातदेखील आम्ही चांगले सिनेमे आणण्यासाठी उत्सुक आहोत, त्यामध्ये ‘मस्तंग’ आणि ‘विंटर स्लीप’ यांसारख्या सुपरहिट सिनेमांचा सहभाग आहे. दरम्यान, या सिनेमाचे डिस्ट्रीब्यूशन पीव्हीआर करणार आहे. 



‘द सेल्समॅन’ या सिनेमाला सर्वात अगोदर २०१६ मध्ये कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये दाखविण्यात आले होते. तिथे या सिनेमास बेस्ट स्क्रीनप्ले आणि हौसॅनी याला बेस्ट अभिनेता म्हणून पुरस्कार देण्यात आला होता. शिवाय निर्माता असगर फरहादी यांना त्यांच्या २०११ मध्ये आलेल्या ‘अ‍ॅस्परेशन’ या सिनेमास गोल्डन ग्लोब अवॉर्ड आणि बेस्ट फॉरेन लॅँग्वेज सिनेमासाठी दोन अकॅडमी अवॉर्ड मिळाले होते. या सिनेमात लीला हातमी, पेमॅन मोआदी, शाहब हौसेनी, सरेह बेयत आणि सरिना फरहादी यांच्या प्रमुख भूमिका होत्या. 

त्याचबरोबर या सिनेमास बर्लिन फिल्म फेस्टिव्हलमध्येही बेस्ट फिल्मसाठी गोल्डन बियर आणि बेस्ट अ‍ॅक्टर, अ‍ॅक्ट्रेससाठी सिल्वर बियर अवॉर्ड मिळाले होते. गोल्डन बियर अवॉर्ड जिंकणारा हा पहिला इरानियन सिनेमा ठरला होता. शिवाय २०१२ मध्ये असगर फरहादी यांना टाइम्स मॅग्झीनच्या जगातील शंभर प्रभावशाली व्यक्तींच्या यादीत स्थान दिले होते. 

एकंदरीत असगर फरहादी यांच्या सिनेमांचा प्रभाव अजूनही कायम असून, त्यांच्या ‘द सेल्समॅन’ने आॅस्करसारख्या प्रतिष्ठेच्या अवॉर्ड सोहळ्यात दबदबा निर्माण केला होता. या सिनेमास बेस्ट फॉरेन कॅटेगिरीसाठी गौरविण्यात आले होते. आता हा सिनेमा भारतात रिलीज केला जाणार असून, प्रेक्षक त्यास कशा पद्धतीने स्वीकारणार आहेत, हे बघणे मजेशीर ठरेल. 

Web Title: Oscar winner 'The Salesman' will be released in India on 31st March

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.