Oscar 2024 : इमा स्टोन दुसऱ्यांदा ठरली सर्वोत्कृष्ट अभिनेत्री; वाचा ऑस्कर २०२४ विजेत्यांची संपूर्ण यादी

By ऑनलाइन लोकमत | Published: March 11, 2024 08:39 AM2024-03-11T08:39:07+5:302024-03-11T08:41:11+5:30

96th Academy Awards : 'पुअर थिंग्ज'मधील अभिनयासाठी इमा स्टोनला ऑस्कर मिळाला. ऑस्कर विजेत्यांची यादी एका क्लिकवर वाचा.

Oscar 2024 winner list Emma Stone Wins Best Actress cillian murphy best actor | Oscar 2024 : इमा स्टोन दुसऱ्यांदा ठरली सर्वोत्कृष्ट अभिनेत्री; वाचा ऑस्कर २०२४ विजेत्यांची संपूर्ण यादी

Oscar 2024 : इमा स्टोन दुसऱ्यांदा ठरली सर्वोत्कृष्ट अभिनेत्री; वाचा ऑस्कर २०२४ विजेत्यांची संपूर्ण यादी

96th Academy Awards : मनोरंजनविश्वातील प्रतिष्ठित आणि मानाचा समजला जाणारा  ऑस्कर सोहळा कॅलिफोर्नियामधील डॉल्बी थिएटरमध्ये पार पडला. दरवर्षी जगभरातील सर्वोत्कृष्ट कलाकृतींना हा पुरस्कार दिला जातो. यंदाच्या ९६व्या अकादमी पुरस्काराची घोषणा करण्यात आली आहे. यंदाच्या ऑस्करमध्ये ओपनहायमर, बार्बी आणि पुअर थिंग्ज या सिनेमाला सर्वाधिक नामांकन होती. 

ऑस्कर २०२४मध्ये ओपनहायमर हा सर्वोत्कृष्ट सिनेमा ठरला. तर किलियन मर्फी सर्वोत्कृष्ट अभिनेता ठरला आहे. ओपनहायमरचे दिग्दर्शक ख्रिस्तोफर नोलन यांनी सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक पुरस्कारावर नाव कोरलं. तर यंदाच्या ऑस्करमध्ये इमा स्टोन सर्वोत्कृष्ट अभिनेत्री ठरली आहे. 'पुअर थिंग्ज'मधील अभिनयासाठी इमा स्टोनला हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. इमा स्टोनने दुसऱ्यांदा ऑस्कर पुरस्कारावर नाव कोरलं आहे. याआधी २०१७ मध्ये 'ला ला लँड' या सिनेमासाठी तिला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला होता. 

ऑस्कर २०२४ विजेत्यांची यादी 

सर्वोत्कृष्ट चित्रपट (Best Picture)- Oppenheimer

सर्वोत्कृष्ट अभिनेता (Actor in a Leading Role) -  किलियन मर्फी (Oppenheimer)

सर्वोत्कृष्ट साहाय्यक अभिनेता (Actor in a Supporting Role) - रॉबर्ट डाउनी ज्यु. (Oppenheimer)

सर्वोत्कृष्ट अभिनेत्री (Actress in a Leading Role) - इमा स्टोन (Poor Things) 

सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री (Actress in a Supporting Role ) -Da’Vine Joy Randolph (The Holdovers)

दिग्दर्शक (Direction) - ख्रिस्तोफर नोलन (Oppenheimer) 

डॉक्यूमेंट्री फीचर फिल्म (Documentry Feature Film) - २० डेज इन मारिपूल (20 Days in Mariupol)

डॉक्यूमेंट्री शॉर्ट फिल्म (Documentry Short Film) - द लास्ट रिपेअर शॉप

लाइव्ह अॅक्शन शॉर्ट फिल्म (Live Action Short Film) - द वंडरफुल स्टोरी ऑफ हेनरी शुगर

अॅनिमेटेड शॉर्ट फिल्म (Animated Short Film) - वॉर इज ओव्हर

अॅनिमेटेड फिचर फिल्म (Animated Feature Film) - द बॉय अँड द हेरॉन

सर्वोत्कृष्ट व्हिज्युअल इफेक्ट (Visual Effect) - गॉडझिला मायनस वन

ओरिजनल स्क्रीन प्ले (Original Screenplay) - अॅनाटॉमी ऑफ अ फॉल 

सर्वोत्कृष्ट अडॅप्टेड स्क्रीनप्ले (Best Adopted Screenplay) - अमेरिकन फिक्शन

केशभुषा आणि मेकअप (Makeup Ans Hairstyling) - पुअर थिंग्ज

सर्वोत्कृष्ट प्रॉडक्शन डिझाइन (Production Design) -पुअर थिंग्ज

सर्वोत्कृष्ट कॉस्च्युम डिझाइन (Costume Design) - पुअर थिंग्ज

सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय चित्रपट (Best International Film) - द झोन ऑफ इंटरेस्ट

ओरिजनल स्कोअर (Original Score) - Oppenheimer

फिल्म एडिटिंग (Film Editing) - Oppenheimer

सिनेमॅटोग्राफी (Cinematography) - Oppenheimer

ओरिजनल साँग (Original Song) - बिली इलिश (व्हॉट वॉज ऑय मेड फॉर - बार्बी)

सर्वोत्कृष्ट साउंड (Best Sound) - द झोन ऑफ इंटरेस्ट

ऑस्कर २०२४ मध्ये ओपनहायमर, पुअर थिंग्ज आणि बार्बी या सिनेमाला सर्वाधिक नामांकने मिळाली होती. त्यामुळे या सिनेमांमध्ये तगडी टक्कर पाहायला मिळाली. यंदाच्या ऑस्करमध्ये ओपनहायमर सिनेमान तब्बल ७ अवॉर्ड नावावर केले आहेत. सर्वोत्कृष्ट चित्रपट, अभिनेता, साहायक्क अभिनेता आणि दिग्दर्शक याबरोबरच ओरिजनल स्कोअर, सिनेमॅटोग्राफी, फिल्म एडिटिंग या कॅटेगरीतही ओपनहायमरला ऑस्कर मिळाला आहे. तर 'पुअर थिंग्ज' सिनेमाला ४ ऑस्कर मिळाले आहेत. 

Web Title: Oscar 2024 winner list Emma Stone Wins Best Actress cillian murphy best actor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.