Oscar 2024 : ऑस्करच्या शर्यतीत भारताची 'To Kill A Tiger' डॉक्युमेंट्री फिल्म, वाचा नामांकनाची संपूर्ण यादी

By ऑनलाइन लोकमत | Published: March 9, 2024 12:51 PM2024-03-09T12:51:02+5:302024-03-09T12:53:41+5:30

Oscar Nominations 2024 : ९६व्या अकादमी पुरस्कारासाठी नामांकने जाहीर करण्यात आली आहेत. यंदा ऑस्करच्या शर्यतीत एका भारतीय दिग्दर्शिकेच्या डॉक्युमेंट्री फिल्मलाही नामांकन मिळालं आहे.

Oscar 2024 indian director niha pahuja To Kill A Tiger get nomination in documentary feature film | Oscar 2024 : ऑस्करच्या शर्यतीत भारताची 'To Kill A Tiger' डॉक्युमेंट्री फिल्म, वाचा नामांकनाची संपूर्ण यादी

Oscar 2024 : ऑस्करच्या शर्यतीत भारताची 'To Kill A Tiger' डॉक्युमेंट्री फिल्म, वाचा नामांकनाची संपूर्ण यादी

ऑस्कर २०२४ (Oscar 2024 ) हा मनोरंजनविश्वातील प्रतिष्ठित आणि मानाचा समजला जाणारा  पुरस्कार आहे. दरवर्षी जगभरातील सर्वोत्कृष्ट कलाकृतींना हा पुरस्कार दिला जातो. ९६व्या अकादमी पुरस्कारासाठी नामांकने जाहीर करण्यात आली आहेत. यंदा ऑस्करच्या शर्यतीत एका भारतीय दिग्दर्शिकेच्या डॉक्युमेंट्री फिल्मलाही नामांकन मिळालं आहे.ऑस्कर २०२४ मध्ये २३ श्रेणींसाठी नामांकन जाहीर करण्यात आली आहेत. यामध्ये  दिग्दर्शिका निशा पहुजा हिच्या 'टू किल अ टायगर' या डॉक्युमेंट्री फिल्मला नामांकन मिळालं आहे. 

ऑस्कर २०२४ नामांकनाची यादी

सर्वोत्कृष्ट चित्रपट (Best Picture)

अमेरिकन फिक्शन (American Fiction)
अनाटॉमी ऑफ अ फॉल (Anatomy of a Fall)
बार्बी (Barbie)
द होल्डओव्हर्स (The Holdovers)
किलर्स ऑफ द मून (Killers of the Flower Moon)   
मेस्ट्रो (Maestro)  
ओपनहायमर (Oppenheimer)
पास्ट लाइव्स(Past Lives) 
पुअर थिंग्स (Poor Things)  
द झोन ऑफ इंटरेस्ट (The Zone of Interest)

सर्वोत्कृष्ट अभिनेता (Actor in a Leading Role) 

ब्रॅडली कुपर - Maestro  
कॉलमॅन डोमिंगो  - Rustin 
पॉल गिमाटी - The Holdovers  
सिलियन मर्फी - Oppenheimer  
जेफरी राइट - American Fiction

सर्वोत्कृष्ट अभिनेत्री (Actress in a Leading Role)

अनेटी बेनिंग  - Nyad  
लिली ग्लॅडस्टोन - Killers of the Flower Moon
सँड्रा हिलर - Anatomy of a Fall
कॅरी मलिगन - Maestro
इमा स्टोन - Poor Things

सर्वोत्कृष्ट साहाय्यक अभिनेता (Actor in a Supporting Role)

स्टरलिंग ब्राउन -  American Fiction  
रॉबर्ट निरो -  Killers of the Flower Moon  
रॉबर्ट डाउनी ज्यु.- Oppenheimer  
रायन गॉसलिंग - Barbie  
मार्क रफॅलो - Poor Things  

सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री (Actress in a Supporting Role )

एमिली ब्लंट - ओपनहायमर
डॅनियल ब्रुक - द कलर पर्पल
अमेरिका फेरेरा - बार्बी
जोदी फॉस्टर - Nyad
Da’Vine Joy Randolph -The Holdovers

दिग्दर्शक (Direction)

जस्टिन ट्राइट - Anatomy of a Fall 
मार्टिन - Killers of the Flower Moon  
क्रिस्तोफर नोलन  - Oppenheimer 
Yorgos Lanthimos - Poor Things
Jonathan Glazer - The Zone of Interest

डॉक्यूमेंट्री फीचर फिल्म (Documentry Feature Film)

बॉबी वाइन: द पीपल्स प्रेसिडेंट (Bobi Wine : The Peoples President)
द इटरनल मेमोरी (The Eternal Memory)
फोर डॉटर्स (Four Daughters)
टू किल अ टाइगर (To Kill A Tiger)
२० डेज इन मारिपूल (20 Days in Mariupol)

डॉक्यूमेंट्री शॉर्ट फिल्म (Documentry Short Film)

द एबीसीस ऑफ बुक बॅनिंग (The ABCs of Book Banning)
द बार्बर ऑफ़ लिटिल रॉक (The Barber of Little Rock)
आइलैंड इन बिटवीन (Island in Between)
द लास्ट रिपेयर शॉप (The Last Repair Shop)
नी नाइ एंड वाईपो (Nǎi Nai & Wài Pó)

लाइव्ह अॅक्शन शॉर्ट फिल्म (Live Action Short Film)

The After (द आफ्टर)
Invincible (इनव्हिनसिबल)
Night of Fortune (नाईट ऑफ फॉर्च्यून)
Red, White and Blue (रेड, व्हाइट अँड ब्लू)
The Wonderful Story of Henry Sugar ( द वंडरफुल स्टोरी ऑफ हेनरी शुगर) 

अॅनिमेटेड शॉर्ट फिल्मा (Animated Short Film)

Letter to a Pig  (लेटर टू अ पिग)
Ninety-Five Senses (नाइन्टी फाइव्ह सेन्सेस)
Our Uniform (अव्हर युनिफॉर्म)
Pachyderme
War Is Over! Inspired by the Music of John & Yo

या व्यतिरिक्त वेशभुषा, ओरिजनल साँग, सिनेमॅटोग्राफी, ओरिजनल स्क्रीनप्ले, इंटरनॅशनल फिचर फिल्म, मेकअप अँड हेअरस्टाइल, प्रोडक्शन डिजाइन, व्हिज्युअल इफेक्ट, फिल्म एडिटिंग या कॅटेगरीतही नामांकन जाहीर करण्यात आली आहेत. यंदाचा ऑस्कर सोहळा १० मार्च २०२४ रोजी होणार आहे. अमेरिकन टेलिव्हिजन होस्ट आणि कॉमेडियन जिमी किमेल समारंभाचे सूत्रसंचालन करतील आणि अमेरिकेत संध्याकाळी 7 वाजल्यापासून (भारतात सोमवारी सकाळी 5.30 वाजता) पुरस्कार प्रदान केले जातील.
 

Web Title: Oscar 2024 indian director niha pahuja To Kill A Tiger get nomination in documentary feature film

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.