OMG...! या कारणामुळे गायकाने सोडलं मोबाईल वापरणं, असा करतो लोकांशी संपर्क
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2019 08:00 IST2019-12-03T08:00:00+5:302019-12-03T08:00:00+5:30
या कारणामुळे या गायकाकडे नाही मोबाईल

OMG...! या कारणामुळे गायकाने सोडलं मोबाईल वापरणं, असा करतो लोकांशी संपर्क
'फोटोग्राफ'चा गायक एड शीरन जवळ एकही फोन नाही. त्याच्याशी लोक ईमेल मार्फत संपर्क साधतात. शीरनने २०१५ मध्ये सर्व इलेक्ट्रॉनिक डिवाईस व सोशल नेटवर्किंग साईडचा त्याग केला होता. त्याने जग भ्रमंती करण्यासाठी जवळपास १ वर्षांचा ब्रेक घेतला होता.
फिमेल फर्स्ट डॉट को डॉट युकेच्या रिपोर्टनुसार, ब्रिटेनच्या ’ब्रिटेन्स आईएम अ सेलिब्रिटी..गेट मी आउट ऑफ हेयर’ या शोच्या एका एपिसोडमध्ये एड शीरनचा मित्र रोमन केंपने सांगितलं की, एडजवळ फोन नाही, तुम्ही त्याला मेल करू शकता.
२०१७ साली एडने सर्व डिवाईसचा त्याग करण्यामागचा खुलासा करत सांगितलं होतं की, असं केल्यामुळे त्याला त्याच्यावरील तणाव कमी व्हायला मदत मिळते.
पुढे म्हणाला की, मी एक आयपॅड विकत घेतलं आहे. ज्यात मी फक्त ईमेल पाहतो आणि त्यामुळे माझ्यावरील ताण खूप कमी राहतो. मी सकाळी सकाळी उठत नाही आणि मला ५० मेसेजना उत्तर देण्याची देखील गरज भासत नाही. अशात मी फक्त झोपेतून उठत आरामात चहाचा आनंद घेतो.