OMG : ‘या’ कारणामुळे लिओनार्दो डिकॅप्रियोने परत केला आॅस्कर!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2017 18:32 IST2017-06-21T12:41:05+5:302017-06-21T18:32:02+5:30

हॉलिवूडमध्ये सध्या अभिनेता लिओनार्दो डिकॅप्रियो याच्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. होय, ‘द रेवेनंट’ या चित्रपटासाठी आॅस्कर हा सर्वोच्च पुरस्कार ...

OMG: Leonardo DiCaprio returns to Oscar for 'this' reason | OMG : ‘या’ कारणामुळे लिओनार्दो डिकॅप्रियोने परत केला आॅस्कर!!

OMG : ‘या’ कारणामुळे लिओनार्दो डिकॅप्रियोने परत केला आॅस्कर!!

लिवूडमध्ये सध्या अभिनेता लिओनार्दो डिकॅप्रियो याच्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. होय, ‘द रेवेनंट’ या चित्रपटासाठी आॅस्कर हा सर्वोच्च पुरस्कार सन्मानित करण्यात आलेल्या लिओनार्दोने असा निर्णय का घेतला असावा असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. कदाचित असा प्रश्न तुमच्या मनातही निर्माण झाला असेल. परंतु कुठल्याही निष्कर्षापर्यंत पोहोचण्याआधी खालील बातमी सविस्तर वाचा. 

वास्तविक लिओनार्दोने जो पुरस्कार परत केला तो आॅस्कर त्याला मिळालेल्या ‘द रेवेनंट’ या चित्रपटासाठीचा नाही. खरं तर लिओनार्दोला आतापर्यंत केवळ एकच आॅस्कर मिळाला असून, तो परत करण्याचा त्याने कधी विचार केला नाही; मात्र त्याने जो पुरस्कार परत केला तो त्याला एका प्रॉडक्शन कंपनीचा होता. या कंपनीने त्याला तो भेट स्वरूपात दिला होता. १९५४ मध्ये आलेल्या ‘आॅन द वॉटर फ्रंट’ या चित्रपटासाठी मार्लो ब्रांडो याला आॅस्कर मिळाला होता. पुढे हाच आॅस्कर रेड ग्रेनाइट पिक्चर्स या प्रॉडक्शन कंपनीने लिओनार्दो डिकॅप्रियो याला भेट दिला. 

सध्या ही कंपनी मलेशियामध्ये भ्रष्टाचार आणि मनी लॉण्डरिंग प्रकरणात अडकली असल्याने लिओनार्दोने त्यांनी भेट दिलेला हा पुरस्कार परत केला आहे. या कंपनीने लिओनार्दोला ३.२ मिलियन डॉलरची एक पिकासो पेंटिंगदेखील गिफ्ट केली होती. त्यामुळे ही पेंटिंगदेखील लिओनार्दोकडून परत केली जाण्याची शक्यता आहे. सध्या लिओनार्दो हॉलिवूडमध्ये आघाडीचा अभिनेता असून, त्याला कुठल्याही प्रकरणात स्वत:ला अडकून घ्यायचे नाही. त्यामुळेच त्याने आॅस्कर परत घेऊन या प्रकरणापासून स्वत:ला दूर ठेवले आहे. 

दरम्यान, गेल्या आॅस्कर पुरस्कार सोहळ्यात लिओनार्दो डिकॅप्रियोला ‘द रेवेनंंट’ या चित्रपटातील सर्वोत्तम अभिनयासाठी आॅस्करने सन्मानित केले होते. चित्रपटात त्याची भूमिका बघण्यासारखी होती. लिओनार्दोला मिळालेल्या या आॅस्करचे जगभरातून समर्थन केले गेले. कारण त्याचा अभिनय या पुरस्कारासाठी पात्र होता, अशी प्रतिक्रिया सर्व स्तरांतून व्यक्त केली गेली. 

Web Title: OMG: Leonardo DiCaprio returns to Oscar for 'this' reason

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.