क्रिस्टन स्टिवर्टला फॅशन जगतात वाटतेय Uncomfortable

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2017 18:05 IST2017-03-04T12:35:19+5:302017-03-04T18:05:19+5:30

बॉलिवूड असो वा हॉलिवूड येथे काम करणाºया सेलिब्रेटींना फॅशनच्या रॅम्पवर स्वत:ला सिद्ध करावेच लागते. कारण ग्लॅमरशी संबंधित असलेल्या फॅशन ...

Kristen Stewart seems to live in fashion Uncomfortable | क्रिस्टन स्टिवर्टला फॅशन जगतात वाटतेय Uncomfortable

क्रिस्टन स्टिवर्टला फॅशन जगतात वाटतेय Uncomfortable

लिवूड असो वा हॉलिवूड येथे काम करणाºया सेलिब्रेटींना फॅशनच्या रॅम्पवर स्वत:ला सिद्ध करावेच लागते. कारण ग्लॅमरशी संबंधित असलेल्या फॅशन जगतात तुमचे वलय तुमच्या करिअरला दिशा देणारे असते. परंतु यास हॉलिवूड अभिनेत्री क्रिस्टन स्टिवर्ट अपवाद असून, तिला फॅशन जगतात अन्कम्फर्टेबल वाटत असल्याचे तिने सांगितले आहे. 

त्याचबरोबर स्टिवर्टने हेही मान्य केले की, तिला शॅनल (फॅशन हाउस)चे रचनात्मक दिग्दर्शक कार्ल लेगरफील्ड यांच्यासोबतच काम करताना कम्फर्टेबल वाटते. कारण फॅशन जगताशी जुळलेल्या डिझायनरपेक्षा त्यांची विचार करण्याची क्षमता वेगळी आहे. कार्लने अभिनेत्रीच्या व्यक्तिमत्त्वानुसारच कपडे डिझाइन करीत असल्याने त्यांच्यासोबत काम करताना कुठल्याही प्रकारची भावना अथवा भीती मनात येत नसल्याचेही क्रिस्टनने स्पष्ट केले. 



फिमेलफर्स्ट डॉट कॉ डॉट यूके या वेबसाइटने दिलेल्या माहितीनुसार, क्रिस्टनने कार्लसोबत काम करण्याचे अनुभव कथन करताना सांगितले की, त्याने मला सुरुवातीपासून जशी आहेस तशीच रहा असा सल्ला दिला आहे. त्याचा हा सल्ला आपुलकीचा वाटल्यानेच मी फॅशनच्या रॅम्पवर स्वत:ला मिरवू शकले. मात्र कार्ल ऐवजी कोणीही मला फॅशन जगतात अशाप्रकारचा सल्ला दिला नसल्याने मला या क्षेत्रात खूपच अन्कम्फर्टेबल वाटत असल्याचे तिने सांगितले. 

क्रिस्टन स्टिवर्टने ‘ट्विलाइट’, ‘इकवल्स’ आणि ‘स्नो व्हाइट अ‍ॅण्ड द हंट्समॅन’ यांसारख्या सिनेमांमध्ये काम केलेले आहे. मात्र ती याबाबत फारशी समाधानी नसल्याचेही दिसून आले. कारण तिने म्हटले की, माझ्या करिअरच्या काळात मी बरेचसे चुकीचे सिनेमेही निवडले आहेत. त्यामुळे मी अजूनही योग्य त्या सिनेमांचा शोध घेत असल्याचेही तिने सांगितले. 

Web Title: Kristen Stewart seems to live in fashion Uncomfortable

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.