साखरपुड्याच्या चर्चांना जेनिफर लोपेजने दिला पूर्णविराम!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2017 21:09 IST2017-03-13T15:35:39+5:302017-03-13T21:09:32+5:30

गायिका तथा अभिनेत्री जेनिफर लोपेज हिने साखरपुड्यांच्या चर्चांना निराधार सांगत या निव्वळ अफवा असल्याचे म्हटले आहे. गेल्या काही दिवसांपासून ...

Jennifer Lopez gave a break to Chetchaduddin Chatterjee !! | साखरपुड्याच्या चर्चांना जेनिफर लोपेजने दिला पूर्णविराम!!

साखरपुड्याच्या चर्चांना जेनिफर लोपेजने दिला पूर्णविराम!!

यिका तथा अभिनेत्री जेनिफर लोपेज हिने साखरपुड्यांच्या चर्चांना निराधार सांगत या निव्वळ अफवा असल्याचे म्हटले आहे. गेल्या काही दिवसांपासून बॉयफ्रेंड एलेक्स रोडरिग्ज याच्यासोबत ती लवकरच विवाहबंधनात अडकणार असल्याची चर्चा होती. तत्पूर्वी या दोघांना जेव्हा मियामी येथे बघण्यात आले होते, तेव्हा जेनिफरच्या बोटात चमचमणारी अंगठी स्पष्टपणे या दोघांनी गुपचूप साखरपुडा उरकल्याचे संकेत देत होती. 

त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून जेनिफर आणि एलेक्स यांच्या साखरपुड्यावरून सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगली होती. त्याचबरोबर आता हे दोघे लवकरच विवाहबंधनात अडकणार असल्याचेही अंदाज बांधले जात होते. परंतु जेनिफरने या चर्चा निव्वळ अफवा असल्याचे सांगत साखरपुड्याच्या चर्चांना पूर्णविराम दिला आहे. 



यूसवीकली डॉट कॉम या वेबसाइटच्या एका सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, ‘जेनिफर एलेक्सला भेटण्यासाठी मियामी येथे गेली होती. यावेळी तिच्यासोबत नऊ वर्षीय जुळे मुले एम्मे आणि मॅक्स हेदेखील सोबत होते. त्यामुळे या दोघांनी साखरपुडा उरकला असावा, असा अंदाज बांधला जात होता. मात्र हा अंदाज आता पूर्णपणे फोल ठरला आहे. 

दरम्यान, लॉस एंजिलिस येथे झालेल्या एका कार्यक्रमादरम्यान या दोघांची भेट झाली होती. पुढे हे दोघे एकमेकांना डेट करीत होते. दोघेही त्यांच्या जीवनातील एका विशिष्ट वळणावर असल्याने त्यांना एकमेकांची संगत आवडू लागली. पुढे या भेटींचे रूपांतर प्रेमात झाले. त्यामुळे हे दोघे विवाहबंधनात अडकतील हे जवळपास निश्चित समजले जात होते. एलेक्सलाही नताशा (१२) आणि एल्ला (८) अशी दोन मुले आहेत. 

Web Title: Jennifer Lopez gave a break to Chetchaduddin Chatterjee !!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.