हा सुपरस्टार दरवर्षी एक आठवडा स्वत:ला करणार क्वारंटाइन, आहे कोरोना पॉझिटीव्ह!
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2020 16:26 IST2020-04-22T16:25:21+5:302020-04-22T16:26:11+5:30
काही दिवसांपूर्वीच या सुपरस्टारला कोरोनाची लागण झाली.

हा सुपरस्टार दरवर्षी एक आठवडा स्वत:ला करणार क्वारंटाइन, आहे कोरोना पॉझिटीव्ह!
कोरोना महामारीमुळे चीन, रशिया, इटलीच नाही तर अमेरिकेसारखी महासत्ता सुद्धा सैरभैर झाली आहे. हॉलिवूडचे अनेक सेलिब्रिटीही कोरोनाच्या विळख्यात सापडले आहेत. हॉलिवूड सुपरस्टार इडरिस एल्बा यापैकीच एक. काही दिवसांपूर्वीच इडरिस एल्बाला कोरोनाचे निदान झाले. पाठोपाठ त्याच्या पत्नीलाही कोरोनाची लागण झाली. यानंतर अनेक दिवसांपासून हे दोघेही क्वारंटाइनमध्ये आहेत. या आजाराने इडरिसला पुरते हादरवून सोडले आहे. कदाचित हा काळ, हे दिवस तो कधीही विसरणार नाही. किंबहुना इडरिस स्वत:ला याचा विसर पडू देणार नाही. होय, आता इरिस दरवर्षी एक आठवड्यासाठी स्वत:ला क्वारंटाइन करणार आहे.
इडरिसने स्वत: याची घोषणा केली. ‘यानंतर दरवर्षी मी स्वत:ला एक आठवडा क्वारंटाइन करणार आहे. जेणेकरून हा काळ सतत स्मरणात राहिल. एका विषाणूने अचानक आयुष्य बदलले. अचानक झालेल्या या बदलांशी सगळ्यांच्या भावना जुळलेल्या आहेत. प्रचंड उलथापालथ घडवून आणणारा हा काळ आहे,’ असे त्याने म्हटले आहे.
एल्बाने ट्विटरवर एक व्हिडीओ शेअर करत कोरोना झाल्याची माहिती दिली होती. ‘आज सकाळी मी चाचणी केली आणि मी कोरोना पॉझिटीव्ह असल्याचे स्पष्ट झाले. आत्तापर्यंत माज्यात या आजाराची कुठलीही लक्षणे नाही. पण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे समजल्यानंतर मी आयसोलेट झालो आहे आणि एकांतात वेळ घालवतो आहे. मित्रांनो घरी राहा, सावध राहा’ असे त्याने म्हटले होते.