हॉलिवूड स्टार विन डीजलने दीपिका पादुकोणसोबतचा थ्रोब्रॅक फोटो केला शेअर, चाहत्यांना दिली मोठी हिंट

By ऑनलाइन लोकमत | Published: March 27, 2024 02:52 PM2024-03-27T14:52:18+5:302024-03-27T14:53:44+5:30

Deepika Padukone : बॉलिवूडची मस्तानी दीपिका पादुकोणचे हॉलिवूडमध्येही अनेक चाहते आहेत. जगभरात तिला पसंत करणारे अनेक लोक आहेत. अशा लोकांमध्ये प्रसिद्ध हॉलिवूड अभिनेता विन डिझेलच्या नावाचाही समावेश आहे.

Hollywood Star Vin Diesel Shares Throwback Photo With Deepika Padukone, Gives Big Hint To Fans | हॉलिवूड स्टार विन डीजलने दीपिका पादुकोणसोबतचा थ्रोब्रॅक फोटो केला शेअर, चाहत्यांना दिली मोठी हिंट

हॉलिवूड स्टार विन डीजलने दीपिका पादुकोणसोबतचा थ्रोब्रॅक फोटो केला शेअर, चाहत्यांना दिली मोठी हिंट

बॉलिवूडची मस्तानी दीपिका पादुकोणचे हॉलिवूडमध्येही अनेक चाहते आहेत. जगभरात तिला पसंत करणारे अनेक लोक आहेत. अशा लोकांमध्ये प्रसिद्ध हॉलिवूड अभिनेता विन डिझेलच्या नावाचाही समावेश आहे. रॉक नावाने प्रसिद्ध असलेला विन डिझेलला दीपिका खूप आवडते आणि अनेकदा तो तिचा उल्लेख करतो. आता विन डिझेलने दीपिका पादुकोणसोबतचा एक फोटो पोस्ट केला आहे, ज्यामध्ये तो तिला ब्लेझर घालताना दिसत आहे. या फोटोसोबत विनने एक लांबलचक पोस्ट देखील लिहिली आहे, ज्यामध्ये एक हिंट दिली आहे.

दीपिका पादुकोणसोबतचा फोटो शेअर करताना विन डिझेलने एका नव्या चित्रपटाचा उल्लेख केला आहे, यावरून असा अंदाज लावला जाऊ शकतो की दीपिका पुन्हा एकदा त्याच्यासोबत दिसणार आहे. यावेळी दीपिका विन डिझेलच्या बहिणीच्या भूमिकेत दिसू शकते. विन डिझेलने लेटेस्ट पोस्टमध्ये आगामी प्रोजेक्टबद्दल इशारा दिला आहे.

रॉकने दिला मोठा इशारा 
विन डिझेलने त्याच्या इंस्टाग्रामवर फोटो शेअर करत लिहिले की, "जेव्हा मी माझ्यासोबत एकापेक्षा जास्त वेळा काम करू इच्छिणाऱ्या दिग्दर्शकांबद्दल विचार करतो तेव्हा मी नेहमीच नम्र होतो. मी भारतात गेलो तेव्हाचा हा फोटो आहे, कारण मी दीपिकाला दिग्दर्शक डीजे कारुसो सोबत भारतात येईन असे वचन दिले होते. माझ्या मोठ्या मुलीने डीजेने मला पाठवलेली स्क्रिप्ट वाचली, ती वाचून ती रडली... मी तिला विचारले की ती का रडली. ती म्हणाली कारण भाऊ आणि बहिणीची ही कथा सत्य होती. ती आणि ती खूप भावनिक होती."

यानंतर विन डिझेलने आपल्या पोस्टमध्ये लोकांना या चित्रपटात आपल्या बहिणीच्या भूमिकेत कोणाला पाहायचे आहे, असे विचारले. त्याने पुढे लिहिले की, जर मी माझ्या मुलीला रडवणारा चित्रपट बनवू शकलो तर माझ्या बहिणीची भूमिका कोण करणार असा माझा प्रश्न तुम्हाला असेल... त्याने जेनिफर लॉरेन्सला सुचवले, तुला काय वाटते?

आता विन डिझेलच्या या पोस्टनंतर दीपिकाचे चाहतेही खूप खूश आहेत, दीपिका आणि विनला पुन्हा पडद्यावर पाहण्याची संधी सर्वांना मिळणार आहे. कारण विन डिझेलने दीपिकाचा फोटो शेअर करताना हे लिहिले आहे, या चित्रपटासाठी दीपिकाला अप्रोच करण्यात आल्याचे समजते. 

Web Title: Hollywood Star Vin Diesel Shares Throwback Photo With Deepika Padukone, Gives Big Hint To Fans

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.