दीपिका पादुकोणच्या आठवणींनी बेचेन होतोय हॉलिवूड स्टार विन डिझेल, वाचा आता त्याने काय केले!
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 23, 2017 19:34 IST2017-09-23T14:04:41+5:302017-09-23T19:34:53+5:30
‘ट्रिपल एक्स’मध्ये दीपिकासोबत काम करणाºया विन डिझेलला दीपिकाच्या आठवणी सतावत आहेत. त्यामुळे तो सातत्याने सोशल मीडियावर दीपिकाच्या आठवणींना उजाळा देत आहे.

दीपिका पादुकोणच्या आठवणींनी बेचेन होतोय हॉलिवूड स्टार विन डिझेल, वाचा आता त्याने काय केले!
ह लिवूड सुपरस्टार विन डिझेल याने बॉलिवूडची मस्तानी दीपिका पादुकोण हिच्यासोबत केवळ एकच चित्रपट केला. परंतु तो तिच्या आठवणींमध्ये आजही बेचेन होत आहे. वास्तविक विनने एकापेक्षा एक अभिनेत्रींसोबत चित्रपट केले आहेत, परंतु मस्तानी दीपिकाचा अंदाज त्याला खूपच भावल्याचे दिसत आहे. म्हणूनच की काय तो तिच्यासोबत घालविलेले क्षण फोटोंच्या माध्यमांतून वारंवार सोशल मीडियावर शेअर करून आठवणींना उजाळा देत आहे. आता त्याने पुन्हा एक दीपिकासोबतचा फोटो शेअर केल्याने, तो तिच्या आठवणींनी बेचेन तर होत नसावा ना? असा प्रश्न दीपिकाच्या चाहत्यांमध्ये व्यक्त केला जात आहे.
वास्तविक दीपिकाचे जलवे केवळ बॉलिवूडमध्येच आहेत, असे नाही तर हॉलिवूडमध्येही आहेत. हे ठामपणे सांगण्याचे कारण की, हॉलिवूड सुपरस्टार विन डिझेल याच्यावर दीपिकाच्या जलव्यांची चांगलीच मोहिनी पडल्याचे दिसत आहे. विन डिझेल दीपिकाची सातत्याने आठवण काढत आहे. त्यासाठी त्याने सोशल मीडियाचा आधार घेतला असून, दीपिकासोबत घालविले क्षण तो फोटो स्वरूपात सोशल मीडियावर शेअर करीत आहे. विनने नुकताच दीपिकासोबतचा एक फोटो त्याच्या इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. फोटोमध्ये दीपिका आणि विन एका आॅटोरिक्षामध्ये फेरफटका मारताना दिसत आहेत. विन जेव्हा भारतात आला होता, तेव्हाचा या दोघांचा हा फोटो आहे.
दरम्यान, दीपिकाने विन डिझेलसोबत ‘ट्रिपल एक्स : रिटर्न आॅफ जेंडर केज’ या चित्रपटात काम केले होते. चित्रपटात दीपिका एका दमदार भूमिकेत बघावयास मिळाली होती. हा चित्रपट अमेरिकेत रिलीज करण्याअगोदरच भारतात रिलीज करण्यात आला होता. चित्रपटाने वर्ल्डवाइज चांगली कमाई केली. दरम्यान, चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान दीपिका आणि विनमध्ये जवळिकता निर्माण झाली होती, अशी चर्चा माध्यमांमध्ये पसरली होती. दीपिकाने एका प्रश्नाचे उत्तर देताना म्हटले होते की, ‘आम्ही दोघे एकमेकांच्या खूप क्लोज आहोत. त्यामुळे आग लागल्याशिवाय धूर निघत नसतो. त्यानंतर विन डिझेलने म्हटले होते की, मी भारतीय चित्रपटांमध्येही काम करू इच्छितो फक्त दीपिका पादुकोण असेल तर.
सध्या दीपिका संजय लीला भन्साळीच्या ‘पद्मावती’ या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. चित्रपटात तिचा बॉयफ्रेंड रणवीर सिंग, शाहिद कपूर प्रमुख भूमिकांमध्ये आहेत. हा चित्रपट रिलीज अगोदरच वादाच्या भोवºयात सापडला आहे.